शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारनं 'तो' निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेवून घेतला?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 9:26 AM

Corona Vaccination: कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा सरकारनं परस्पर घेतल्याची चर्चा

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे. मात्र लसींची टंचाई जाणवत असल्यानं लसीकरणाला गती देण्यात अडथळे येत आहेत. लसींचा तुटवडा जाणवत असतानाच सरकारनं महिन्याभरापूर्वी कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेऊन घेण्यात आला होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

तज्ज्ञांच्या सल्लानं कोविशील्डच्या दोन डोसमधील कालावधी वाढवत असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र अशा प्रकारचा कोणताही सल्ला आपण केंद्राला दिला नसल्याचं पॅनलमधील तीन तज्ज्ञांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं १३ मे रोजी घेतला. त्यावेळी देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती आणि लसींचा साठा कमी होता.

नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनच्या (एनटीएजीआय) शिफारशीनुसार कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. ब्रिटनमध्ये करण्यात आलेलं सर्वेक्षण आणि त्यातून उपलब्ध झालेली आकडेवारी यांच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मात्र अशा प्रकारची शिफारस करण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचं एनटीएजीआयच्या पॅनलमधील १४ पैकी ३ सदस्यांनी सांगितलं आहे.

'जागतिक आरोग्य संघटनेनं दोन डोसमधील अंतर ८ ते १२ आठवडे करण्याचा सल्ला दिला. एनटीएजीआयनं या सल्ल्याची शिफारस केली. मात्र दोन लसींमधला कालावधी १२ आठवड्यांहून अधिक असावा असं एनटीएजीआयनं सुचवलं नव्हतं,' अशी माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इपिडेमिओलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते यांनी दिली. 'आम्ही ८ ते १२ आठवड्यांचं अंतर ठेवण्याची शिफारस केली होती. पण ते १२ ते १६ आठवड्यांचा निर्णय सरकारनं घेतला. हा निर्णय योग्य असू शकतो किंवा मग तो अयोग्यदेखील असू शकतो. आमच्याकडे त्याबद्दलचा तपशील उपलब्ध नाही,' असं गुप्ते यांनी सांगितलं.तज्ज्ञांच्या दाव्यानंतर सरकारकडून स्पष्टीकरणएप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पब्लिक हेल्थ इंग्लंड या ब्रिटनच्या आरोग्य विभागाच्या एजन्सीनं काही आकडेवारी प्रसिद्ध केली. लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ आठवडे ठेवल्यास तिची परिणामकारकता ६५ ते ८८ टक्के असते, असं त्यांच्या संशोधनातून समोर आलं होतं. लसींच्या डोसमधील अंतर १२ आठवड्यांचे ठेवून ब्रिटन कोरोना संकटातून बाहेर आला. प्रत्येकाला १२ आठवड्यांनंतर लसीचा दुसरा डोस मिळतोच असं नाही. त्यामुळे दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेतला गेला, असं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या