शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
6
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
7
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
8
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
9
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
10
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
11
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
12
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
13
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
14
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
15
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
16
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
17
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
18
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
19
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
20
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं

Corona vaccination: आता १८ ते ४४ या वयोगटासाठी वॉक-इन लसीकरणास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 07:50 IST

Corona vaccination Update: केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी केंद्रांवरच उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी केंद्रांवरच उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १८ ते ४४ वयोगटासाठी कोविन प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केल्यामुळे लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळता आली. मात्र, लसींचे डोस वाया जाण्याचे प्रमाण विचारात घेता सरकारने या वयोगटासाठी वॉक-इन लसीकरणासाठी परवानगी दिली आहे.  

४८लाख लसींचे डोस तीन दिवसांत मिळणार  देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याकडे सद्य:स्थितीत कोरोनाप्रतिबंधक लसींचे १ कोटी ८० लाख डोस उपलब्ध असून, येत्या तीन दिवसांत सर्व राज्यांना लसींचे ४८ लाख डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली.  

म्हणून घेतला निर्णयऑनलाईन नोंदणी केल्यानंतरही काही डोस शिल्लक राहू शकतात. अशा स्थितीत डोस वाया जाउ नये यासाठी थेट लसीकरण केंद्रांवर येणाऱ्यांना लस दिली जाउ शकते. मात्र, संबंधित राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करुन याबाबत अंतिम निर्णय घ्यावा.  त्याबाबत लसीकरण अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात यावे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी केंद्रांमध्येच उपलब्ध राहणार आहे.सिडकोने पालघर नवीन शहर प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. ३७७ हेक्टर क्षेत्रफळावर साकारणाऱ्या या नवीन शहराच्या उभारणीचे शाश्वत मॉडेल तयार केले जाणार आहे. त्यासाठी बाजाराचा कल, विकासाच्या संधी आदींबाबत औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घेतली जाणार आहेत.- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको 

केंद्रांचा पुरवठा केंद्राने राज्यांना २१ कोटी ८० लाख डोस उपलब्ध करून दिले आहेत. वाया गेलेल्या लसींसह केंद्राने २३ मेपर्यंत २०,००,०८,८७५ डोसचा पुरवठा केला असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.  

राज्यांकडे सद्य:स्थिती१,८०,४३,०१५ डोस उपलब्ध असून, येत्या तीन दिवसांत राज्यांना ४८,००,६५० डोसचा पुरवठा केला जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत