शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Corona Vaccination: ...'त्या' व्यक्तींना कोरोना लसीचा एकच डोस पुरेसा; दुसऱ्या डोसची गरजच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 9:01 AM

Corona Vaccination: कोरोना लसीकरणाबद्दलची नवी माहिती समोर; लसीकरण मोहिमेची रणनीती बदलण्याची शक्यता

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या आठवड्याभरपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे लसींचा तुटवडा जाणवत आहे. याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होत आहे. देशात लसींचा तुटवडा असताना पाश्चिमात्य देशांमध्ये एक महत्त्वपूर्ण संशोधन झालं आहे. यामुळे कोरोना लसीकरणाची रणनीतीच बदलू शकते.राज्यात दैनंदिन रुग्ण वाढीचा आलेख कायम; दिवसभरात ६६,१५९  रुग्ण, तर ७७१ मृत्यूसध्या कोरोना लसीचे दोन डोस दिले जातात. मात्र कोरोनावर मात केलेल्यांना दोन डोसची गरज नाही. त्यांना केवळ एक डोस पुरेसा असल्याची माहिती पुढे आली आहे. पेन इंन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीनं याबद्दल संशोधन केलं. याबद्दलची माहिती सायन्स इम्युनॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झाली. कोरोना विषाणूवर मात केल्यानंतर मानवी शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज दोन प्रकारच्या असतात. टी किलर सेल्स अँटिबॉडी विषाणूला संपवतात. तर दुसऱ्या अँटिबॉडीज मेमरी बी सेल्स असतात. विषाणूनं भविष्यात पुन्हा हल्ला केल्यास त्याला ओळखून प्रतिकारशक्तीला सतर्क करून विषाणूचा खात्मा करण्यासाठी किलर सेल्स तयार करण्याचं काम या अँटिबॉडीज करतात.कोरोनाची दुसरी लाट मे अखेरीस ओसरणार; महाराष्ट्रापासूनच होणार सुरुवातसंशोधन काय सांगतं?पेन इंन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीनं केलेल्या सर्वेक्षणानुसार कोरोनावर मात केलेल्या अमेरिकेतील अनेक व्यक्तींना लसीचा पहिला डोस दिला गेल्यानंतर त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात एँटीबॉडीज तयार झाल्या. मात्र दुसऱ्या डोसला त्यांच्या शरीराकडून मिळणारा प्रतिसाद मर्यादित स्वरुपाचा होता. तर कोरोनाची लागण न झालेल्या व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आल्यानंतर काही दिवसांनंतर परिणाम दिसून आले. अशा प्रकारचं संशोधन याआधी इटली, इस्रायलसह अनेक देशांमध्ये करण्यात आलं आहे.या संशोधनानं काय साधलं?ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, नव्या संशोधनामुळे फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनीसारख्या युरोपीय देशांमधील लसीकरण मोहिमेची रणनीती बदलण्यात आली. कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना दोन डोसऐवजी एकच डोस देण्यात आला. इस्रायलनं काही दिवसांपूर्वीच सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण होऊन देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली. इस्रायलमध्येही कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना केवळ एकच डोस देण्यात आला. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस