Corona Vaccination: भन्नाट आयडिया! कोरोना लसीसोबत सोन्याची नथ गिफ्ट; नागरिक मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 12:11 PM2021-04-04T12:11:50+5:302021-04-04T12:21:22+5:30

Corona Vaccination in Gujrat: गेल्या 24 तासांत कोरोनाचे 93,249 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 60,048 रुग्ण बरे झाले आहेत. 513 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वेग एवढा प्रचंड आहे की, गेल्या 5 महिन्यांत पहिल्यांदाच कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले आहेत.

Corona Vaccination: Gold gift with corona vaccine; idea of jewelers association in Rajkot | Corona Vaccination: भन्नाट आयडिया! कोरोना लसीसोबत सोन्याची नथ गिफ्ट; नागरिक मालामाल

Corona Vaccination: भन्नाट आयडिया! कोरोना लसीसोबत सोन्याची नथ गिफ्ट; नागरिक मालामाल

googlenewsNext

राजकोट: देशभरात कोरोनाची दुसरी लाट (Corona Virus Second Wave) वेगाने पसरू लागली आहे. देशात गेल्या 24 तासांत 93 हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत. यामुळे सर्वच राज्यांना कोरोनाचे लसीकरण (Corona Vaccination) वेग वाढविण्यास सांगितले आहे. अनेकजण कोरोना लसीचे दुष्परिणाम असल्याचे पाहून लस घेण्यास चालढकल करत आहेत. अशातच कोरोना लसीकरण वाढावे यासाठी गुजरातच्या सोनारांनी भन्नाट आयडिया लढविली आहे. कोरोना लसीकरण केंद्रामध्ये येणाऱ्या नागरिकाला एक खास गिफ्ट देण्यात येत आहे. (Gujrat jewellers giving gold gift to corona vaccine drive.)


गुजरातच्या राजकोटमध्ये कोरोना लसीकरण केंद्रावर हे गिफ्ट दिले जात आहे. कोरोना लस टोचून घेणाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ज्वेलर असोसिएशनने गिफ्ट देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी स्वत:च्या पुढाकारातून कँप लावला आहे. यामध्ये महिलांसाठी सोन्याची नथ गिफ्टम्हणून दिली जात आहे. तर पुरुषांसाठी हँडब्लेंडर देण्यात येत आहे. 


गेल्या 24 तासांत कोरोनाचे 93,249 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 60,048 रुग्ण बरे झाले आहेत. 513 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वेग एवढा प्रचंड आहे की, गेल्या 5 महिन्यांत पहिल्यांदाच कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले आहेत. देशात एकूण रुग्ण 1,24,85,509 एवढे झाले आहेत. तर मृतांचा आकडा हा 1,64,623 वर पोहोचला आहे. 

CoronaVirus Updates: चिंतेत भर! दिवसभरात तब्बल ९३ हजार नवे रुग्ण; देशातील कोरोनाबाधितांचा उच्चांक


धक्कादायक बाब म्हणजे जगभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे भारतात सापडू लागले आहेत. 4 डिसेंबरनंतर 24 तासांत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. शुक्रवारी 89,000 नवे रुग्ण सापडले होते. तर शनिवारी 93,000 रुग्ण सापडले होते. 


कोरोनाचा वेग....
देशात कोरोनाचा वेग हा तिप्पट झाला आहे. 20 हजार रुग्णांवरून 90 हजार रुग्ण होण्यास केवळ 21 दिवस लागले आहेत. आधीच्या लाटेवेळी यासाठी 64 दिवस लागले होते. अद्याप गेल्या वर्षीएवढ्या सर्वाधिक रुग्णांची संख्या ओलांडण्यास काही हजारांचा टप्पा बाकी आहे. महाराष्ट्रासह ५ राज्यांमध्ये 86 टक्के मृत्यू झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

Web Title: Corona Vaccination: Gold gift with corona vaccine; idea of jewelers association in Rajkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.