शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

Corona vaccination : देशात ९५ कोटी डोसचा टप्पा पूर्ण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 09:14 IST

Corona vaccination in India : गेल्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनाचे १८,१६६ नवे रुग्ण आढळून आले व २१४ जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ३ कोटी ३९ लाखांवर गेला आहे.

नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनाचे १८,१६६ नवे रुग्ण आढळून आले व २१४ जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ३ कोटी ३९ लाखांवर गेला आहे. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची गेल्या २०८ दिवसांतील सर्वात कमी संख्या नोंदली गेली. कोरोना लसींचे ९५ कोटींवर डोस देण्यात आले आहेत.कोरोनाने जीव गमावलेल्यांची संख्या ४ लाख ५० हजार ५८९ झाली आहे. या आजाराच्या नव्या रुग्णांची दररोजची आकडेवारी गेल्या १६ दिवसांपासून ३० हजारांपेक्षा कमी आहे. देशात ३ कोटी ३९ लाख ५३ हजार ४७५ कोरोना रुग्ण आहेत. त्यातील ९७.९९ टक्के लोक या आजारातून बरे झाले. गेल्या मार्चपासूनचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. गेल्या चोवीस तासांत उपचाराधीन रुग्णांमध्ये ५,६७२ ने घट झाली. कोरोनाचा दररोजचा संसर्गदर १.४२ टक्के असून गेल्या ४१ दिवसांपासून हे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोनाचा  दर आठवड्याचा संसर्गदर १.५७ टक्के असून, तो गेल्या १०७ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोनातून आतापर्यंत ३ कोटी ३२ लाख ७१ हजार ९१५ जण बरे झाले आहेत. देशात आजवर ५८ कोटी २५ लाख ९५ हजार ६९३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या, तर नागरिकांना कोरोना लसींचे ९५ कोटींवर डोस देण्यात आले. जगभरात कोरोनाचे २३ कोटी ८४ लाख रुग्ण असून त्यातील २१ कोटी ५६ लाख जण बरे झाले. अमेरिकेमध्ये ४ कोटी ५१ लाख कोरोनाबाधित आहेत व  तिथे ७ लाख ३३ हजार जणांचा मृत्यू झाला.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या