CoronaVaccination: ...तर भारताला ऑगस्टपासून रोज 90 लाख लोकांना द्यावी लागेल लस; असं आहे संपूर्ण गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 03:31 PM2021-05-15T15:31:11+5:302021-05-15T15:32:00+5:30

आतापर्यंत रोज देण्यात आले 15 लाख डोस, आता रोज टोचाव्या लागतील पाच पट अधिक लशी...

Corona vaccination 90 lakh doses per day will be needed in august december to achieve target | CoronaVaccination: ...तर भारताला ऑगस्टपासून रोज 90 लाख लोकांना द्यावी लागेल लस; असं आहे संपूर्ण गणित

CoronaVaccination: ...तर भारताला ऑगस्टपासून रोज 90 लाख लोकांना द्यावी लागेल लस; असं आहे संपूर्ण गणित

Next

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव सुरूच आहे. कोरोना संक्रमणाला ब्रेक लावण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, यात लशीच्या तुटवड्याचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारला आशा आहे, की पुढील महिन्यापासून कोरोना लसीची उपलब्धता वाढेल. जुलै महिन्यापासून 1 ते 44 वर्षांच्या लोकांसाठी लशीची कमतरता दूर होईल, असा सरकारचा अंदाज आहे. यानंतर डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे (जवळपास 94 कोटी) लसिकरण करण्याचे लक्ष आहे. तर जाणून घेऊया, सर्व जनतेचे लसीकरण करण्यासाठी केंद्राला रोज किती लोकांना लस टोचावी लागेल...

केंद्र सरकारने अंदाज लावला आहे, की ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान देशभरात 200 कोटी लशींचे डोस उपलब्ध होतील. यांच्या सहाय्याने 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांचे वेगाने लसीकरण केले जाऊ शकेल. याचबरोबर सरकारने म्हटले आहे, की या वर्षाच्या अखेरीस 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्व लोकांना लस दिली जाईल.

Corona Vaccine: भारत Pfizer कडून खरेदी करणार लशीचे 5 कोटी डोस? केंद्र-कंपनी यांच्यात सुरू आहे चर्चा

आतापर्यंत रोज देण्यात आले 15 लाख डोस -
देशात 16 जानेवारीला सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू  करून कोरोनाविरोधातील लढाईला सुरुवात करण्यात आली. आली. या मोहिमेला आज, शनिवारी चार महिने म्हणजेच 120 दिवस पूर्ण होत आहेत. या 120 दिवसांत भारतात आतापर्यंत जवळपसा 18 कोटी लशींचे डोस देण्यात आले आहेत. सरासरीचा विचार करता, भारताने आतापर्यंत एका दिवसात 15 लाख डोस टोचले आहेत.

गेल्या चार महिन्यांत लसीकरणाची गती मंदावली आहे. तरीही ही सरासरी 15 लाख एवढी आहे. आता पुन्हा एकदा लस टोचण्याचा वेग वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात देशात एका दिवसात 17 लाख लशींचे डोस देण्यात आले. तसेच जुलै अखेरपर्यंत लशीचा पुरवठा वाढेल असा सरकारचा अंदाज आहे. 

स्पुतनिक-व्ही लस भारतात, ‘सिंगल डोस’ही लवकरच येणार; पुढील आठवड्यात बाजारात होणार उपलब्ध

रोज टोचाव्या लागतील पाच पट अधिक लशी -
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या म्हणण्याप्रमाणे, देशातील प्रौढ लोकसंख्या अंदाजे 94 कोटी एवढी आहे आणि या लोकसंख्येला लस देण्यासाठी 188 कोटी डोसची गरज भासेल. प्रौढ लोकांना लस देण्यासाठी वर्षाच्या उर्वरित 231 दिवसात 170 कोटी डोसची गरज असेल. म्हणजेच, आठवड्याचे सात दिवस जोडले तर रोज जवळपास 73.6 लाख डोस द्यावे लागतील. अर्थात, लसिकरणाचा आजचा वेग लक्षात घेता, रोज जवळपास पाच पट डोस द्यावे लागतील.

लसीकरणात भारत आपलाच विक्रम तोडणार -
देशात रोज 90 लाख डोस टोचले जातील. आतापर्यंत कुठल्याही देशाने एका दिवसात याहून अर्ध्ये डोसही टोचलेल्या नाहीत. एका दिवसात सर्वाधिक लशी टोचण्याचा विक्रम भारताच्याच नावावर आहे. हा  विक्रम भारताने 5 एप्रिलला बनवला होता. तेव्हा एका दिवसात 41.6 लाख डोस टोचण्यात आले होते. मात्र, यासाठी केवळ सप्लायच नाही, तर लसीकरण केंद्र आणि मॅनपावरही अनेक पटीने वाढवावी लागेल. 

देशात लवकरच आणखी पाच लसी; चार लसींचे उत्पादन भारतात होणार, नीती आयोगाची माहिती

Web Title: Corona vaccination 90 lakh doses per day will be needed in august december to achieve target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.