शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

TATA ग्रुपकडून कोरोना टेस्ट किट लाँच; अवघ्या 45 मिनिटांत रिझल्ट देणार

By हेमंत बावकर | Published: November 09, 2020 3:57 PM

Corona Virus Test Kit Launch By TaTaMD: टाटाने लाँच केलेले हे टेस्ट किट चिनी टेस्ट किटपेक्षा जास्त परिणामकारक आणि सोपे असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. टाटाच्या टेस्ट किटचे नाव ‘TataMD CHECK’ असे ठेवण्यात आले आहे.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये हजारो कोटी रुपयांची मदत करणाऱ्या टाटा ग्रुपने आता मोठा दिलासा दिला आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक Tata Medical and Diagnostics Ltd (TataMD) ने कोरोना चाचणी करण्यासाठी नवीन टेस्ट किट लाँच केले आहे. यामुळे परदेशी टेस्ट किटवरील खर्चही वाचणार असून मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्यास मदत मिळणार आहे. 

महत्वाचे म्हणजे टाटाने लाँच केलेले हे टेस्ट किट चिनी टेस्ट किटपेक्षा जास्त परिणामकारक आणि सोपे असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. टाटाच्या टेस्ट किटचे नाव ‘TataMD CHECK’ असे ठेवण्यात आले असून CSIR-IGIB (Council of Scientific and Industrial Research-Institute of Genomics and Integrative Biology) सोबत मिळून हे टेस्ट किट बनविण्यात आले आहे. 

टाटाने तयार केलेले हे कोविड-19 टेस्ट किट्स डिसेंबर महिन्यात देशभरातील लॅबमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. सीईओ गिरिश कृष्णमूर्ति (Girish Krishnamurthy) यांनी ही माहिती दिली आहे. आयसीएमआर आणि डीसीजीआयने या चाचणी किटला परवानगी दिली आहे. दर महिन्याला 10 लाख किट चेन्नईतील टाटा फॅक्टरीमध्ये बनविण्यात येणार आहेत. 

टाटा एमडी चेक हे टेस्टकिट फास्ट रिझल्ट देणारे आहे. इमेज बेसड रिझल्ट तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आले आहे. या किटसाठी स्टँडर्ड लॅबोरेटरी यंत्रणा लागणार असून लॅबोरेटरीमध्ये चाचणी केल्यास 45 ते 50 मिनिटांत पहिला रिझल्ट मिळू शकणार आहे. तर आरएनए एक्सट्रॅक्ट सॅम्पलचा एकूण रिझल्ट मिळण्यास 75 मिनिटे लागणार आहेत. हे किट भारतातच विकसित करण्यात आले आहे. 

हे किट वापरण्यासाठी स्किल स्टाफचीही गरज लागणार नाही. यामुळे ग्रामीण भाग, दुर्गम भागातही आरोग्य सेवक कोरोना चाचणी करू शकणार आहेत. तसेच या टेस्ट किटसाठी फार मोठी यंत्रेही लागणार नाहीत. 

किंमत किती? कृष्णमूर्ति यांना या टेस्ट किटच्या किंमतीबाबत विचारले असता त्यांनी किंमत सांगण्यास नकार दिला. वेगवेगळ्या राज्य सरकारांनी खासगी लॅबसाठी दर ठरवून दिलेले आहेत. त्यांमुळे राज्य सरकारे सांगतील ती किंमत असेल असे ते म्हणाले. यासाठी वेगवेगळ्या लॅबोरेटरिजसोबत संपर्क करून अभिप्राय माहविण्यात आले आहेत. आम्हाला समस्या सोडवाय़ची आहे, कोरोनाशी लढायचे आहे, यामुळे किंमत कमीच असेल असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Tataटाटाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या