CoronaVirus News: बेड मिळत नसल्यानं 'तो' दोन तासांपासून रुग्णालयाबाहेर; स्कूटरवर बसून बेडची प्रतीक्षा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 15:44 IST2021-04-18T15:40:16+5:302021-04-18T15:44:14+5:30
CoronaVirus News: देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण; यंत्रणा कोलमडण्याच्या स्थितीत

CoronaVirus News: बेड मिळत नसल्यानं 'तो' दोन तासांपासून रुग्णालयाबाहेर; स्कूटरवर बसून बेडची प्रतीक्षा सुरू
बेड मिळत नसल्यानं 'तो' दोन तासांपासून रुग्णालयाबाहेर; स्कूटरवर बसून बेडची प्रतीक्षा सुरू
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र सध्या तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाही. महाराष्ट्र, दिल्लीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. दिल्लीतील आरोग्य यंत्रणा सध्याच्या घडीला कोसळण्याच्या स्थितीत आहे. कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मात्र त्यांना रुग्णालयात बेडच उपलब्ध होत नाहीत, अशी दिल्लीतील स्थिती आहे.
भयंकर! ऑक्सिजन अभावी तडफडत होते रुग्ण पण डॉक्टर वाचवू शकले नाहीत त्यांचा जीव; 12 जणांच्या मृत्यूने खळबळ
दिल्लीत रुग्णांना बेडसाठी कित्येक तास वाट पाहावी लागत आहे. दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयाबाहेर एक कोरोना रुग्ण स्कूटरवर बसून रुग्णालयातील बेड रिकामा होण्याची वाट पाहत आहे. मंडावलीत राहणाऱ्या दीपकचा कोरोना चाचणी अहवाल काल संध्याकाळी पॉझिटिव्ह आला होता. सकाळच्या सुमारास त्याला श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर दीपकच्या भावानं त्याला स्कूटरवरून रुग्णालयात आणलं.
केजरीवाल म्हणाले, "दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्के, ऑक्सिजनची कमतरता; १०० पेक्षा कमी ICU बेड्स"
दिनेश सिंह त्यांचा भाऊ दीपकला घेऊन योग्य वेळी रुग्णालयात आले. मात्र तिथे त्यांना बेड उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं. 'माझा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आहे. पण सध्या आमच्याकडे बेडच नसल्याचं रुग्णालयाचे कर्मचारी सांगत आहेत. भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही दोन तासांपासून वाट पाहत आहोत. मात्र त्याला रुग्णालयात केव्हा दाखल करून घेतलं जाईल, याची कोणतीही कल्पना आम्हाला देण्यात आलेली नाही. भावाची प्रकृती खराब होत आहे. त्याला श्वास घेण्यातही अडचणी येत आहेत,' अशा शब्दांत दिनेश सिंह यांनी त्यांची व्यथा मांडली.
रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यानं दीपक रुग्णालयाबाहेर स्कूटरवर बसून आहे. त्याचा भाऊ दिनेश सिंहदेखील तिथेच थांबला आहे. दीपकच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. दिल्लीतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यानं रुग्णालयं भरलं आहे. अनेक रुग्णांचे नातेवाईक बाहेर थांबले आहेत. कोरोना रुग्ण बाहेर असल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे.