क्वारंटाईन जेवणााचा कंटाळा आला, कोरोना रुग्णाने ऑनलाईन फुड ऑर्डर केले अन् डिलिव्हार बॉय....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 16:54 IST2020-05-21T16:53:32+5:302020-05-21T16:54:03+5:30
अतिउत्साही डिलेव्हरी बॉयने लोकेशनची शहानिशा न करताच डिलेव्हरी देण्यासाठी तो तिथे पोहचला.

क्वारंटाईन जेवणााचा कंटाळा आला, कोरोना रुग्णाने ऑनलाईन फुड ऑर्डर केले अन् डिलिव्हार बॉय....
जिथे कोरोना रूग्णांच्या उपचारादरम्यान डॉक्टर नर्सेस पीपीई कीट घालून उपचार करत आहेत. असह्य वेदना यावेळी पीपीई कीटमुळे सहन करावे लागत आहेत. अशात एक महाभाग कोरोना रूग्णांने हॉस्पिटलच्या जेवणाचा कंटाळा आला म्हणून चक्क ऑनलाईन फुड ऑर्डर केले. ऑर्डर देण्यासाठी डिलेव्हरी बॉय जिथे पोहचला ती जागा अक्षरक्षः धडकी भरवणारी अशीच होती. तामिळनाडूमध्ये हा प्रकार घडला आहे.
अतिउत्साही डिलेव्हरी बॉयने लोकेशनची शहानिशा न करताच डिलेव्हरी देण्यासाठी तो तिथे पोहचला. मात्र वेळीच कोविड – 19 आयसोलेशन वॉर्डमध्ये जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयला सुरक्षारक्षकाने अडवल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला.
डिलिव्हरी बॉयने सांगितले की,त्याला ही ऑर्डर कोविड रुग्णाने केल्याचे माहित नव्हते. शिवाय ही ऑर्डर क्वारंटाईन सेंटरमध्ये करायची असल्याचेही माहिती नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी कोविड रुग्णांकडे याबाबत चौकशी केली. शेवटी चौघांनी आपण ऑर्डर केल्याचा खुलासा केल्याचे समोर आले. रुग्णालयात रुग्णांची बेजाबादार वागणूक इतरांसाठी खूप भारी पडू शकते याचा अंदाजाही त्यांना नाही. स्वतःची जीव संकटात असताना इतरांनाही संकटात टाकण्याचा हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.