शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Corona death: मृत्यूनंतर भाजपा आमदाराचं पत्र व्हायरल, आरोग्यमंत्र्यांकडे मागितली होती मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 11:53 IST

Corona death: कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,01,187 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे

ठळक मुद्देआमदार केसर सिंह यांचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रामुळे सरकारच्या कामकाजावर आणि आरोग्य यंत्रणेवर टीका करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली असून एका भाजपाआमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदाराला 24 तास ICU बेड मिळाला नसल्याची माहिती मिळत आहे. आता, या आमदारांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 18 एप्रिल रोजी त्यांनी हे पत्र लिहिलं होतं. 

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,01,187 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र याच दरम्यान रुग्णालयात बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाही वेळेत बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी रुग्णालयात असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालं आहे. त्यामध्ये, आपल्याला बेड मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती.  उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) बरेलीतील (bareilly) भाजपा आमदार केसर सिंह गंगवार (BJP Kesar Singh Gangwar) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 एप्रिलला गंगवार कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. सुरुवातीला त्यांना बरेलीच्या राममूर्ती मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण, त्यांना 24 तासांपर्यंत एक आयसीयू बेड मिळाला नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांना नोएडातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मात्र, 18 एप्रिल रोजीच या आमदारांनी डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहून परिस्थिती कळवली होती. तसेच, मला बेड उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही केली होती. 

आमदार केसर सिंह यांचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रामुळे सरकारच्या कामकाजावर आणि आरोग्य यंत्रणेवर टीका करण्यात येत आहे. एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारीची ही अवस्था असेल, तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

भाजपा अध्यक्षांनी व्यक्त केला शोक

यूपी भाजपाचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आमदार केसर सिंह यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेले हे सत्ताधारी भाजपाचे तिसरे आमदार आहे. याआधी औरेयातील आमदार रमेश दिवाकर आणि लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेश श्रीवास्तव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारcorona virusकोरोना वायरस बातम्याbareilly-pcबरेलीHealthआरोग्य