शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Corona Curfew In India: कोरोना रात्रीचाच बाहेर पडतो का? नाईट कर्फ्यूवर नरेंद्र मोदींनी समजावले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 10:33 PM

PM Narendra Modi's Answer on Night Curfew trolling: महाराष्ट्र, पंजाब, लखनऊ, नोएडा, गाझियाबादसह अनेक शहरांत आणि काही राज्यांत रात्रीच्या संचारबंदीसारखे निर्बंध लादण्यात आले आहेत. याच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींना उतरावे लागले आहे.

देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण कमालीचे वाढू लागले आहेत. यामुळे राज्यांनी अनेक ठिकाणी रात्रीच्या कर्फ्यूची (Night Curfew) अंमलबजावणी केली आहे. यावरून देशभरातून नागरिकांनी ट्रोलिंग करण्यास सुरुवात केली असून कोरोना काय रात्रीचाच बाहेर पडतो का, असा सवाल विचारण्यास सुरुवात केली आहे. याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच (Narendra Modi) उत्तर दिले आहे. (Why night curfew implemented to stop Corona Virus; Narendra modi gave Answer to trollers.)

महाराष्ट्र, पंजाब, लखनऊ, नोएडा, गाझियाबादसह अनेक शहरांत आणि काही राज्यांत रात्रीच्या संचारबंदीसारखे निर्बंध लादण्यात आले आहेत. याच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींना उतरावे लागले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोदींनी काही मुद्दे मांडले आहेत. यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली तरी चालेल परंतू कोरोना चाचण्या वाढवा असे आदेश दिले आहेत. सोबतच त्यांनी नाईट कर्फ्यूला कोरोना कर्फ्यूचे नाव दिल्याने लोकांमध्ये कोरोनाविषयी जागरुकता वाढेल आणि ते काळजी घेतली असे सांगितले. तसेच जगभराने नाईट कर्फ्यूचा स्वीकार केला आहे. आता आम्हाला नाईट कर्फ्यू जरी असला तरी त्याला कोरोना कर्फ्यू नावाने आठवणीत ठेवायला हवे असे सांगितले. 

काही बुध्दीवंत कोरोना रात्राचा येतो का, असे विचारत आहेत. जगाने हा कर्फ्यू स्वीकारला आहे. कारण प्रत्येकाला कर्फ्यू काळात विचार येतो की तो कोरोना काळात जगतोय. आपण रात्री 9 ते सकाळी 5 या काळात नाईट कर्फ्यू केल्यास चांगले होईल. यामुळे अन्य व्यवस्था प्रभावित होणार नाहीत. तसेच नाईट कर्फ्यूला कोरोना कर्फ्यू म्हणून लागू करावे, ते जास्त प्रभावी होईल, असे मोदी म्हणाले.

Corona Vaccination: देशात 11 ते 14 एप्रिल 'लसीकरण उत्सव'; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणादेशात कोरोना रुग्ण वाढण्याचे नेमके कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या (CM Meeting with PM) बैठकीत सांगितले आहे. आपण कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) नादात कोरोना चाचण्यांकडे (Corona Testing) दुर्लक्ष केले आणि कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाल्याचे मोदी म्हणाले. तसेच येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत 'लसीकरण उत्सव' साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. (11th to 14th April can be observed as 'Tika (vaccination) Utsav' for COVID19 vaccination: Prime Minister Narendra Modi)

कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, पण...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्र्यांना आदेशकोरोनाचे रुग्ण वाढल्याने एकीकडे राजकारण रंगलेले असताना मोदींनी मुख्यमंत्र्यांना हे आदेश दिले आहेत. सर्व राज्यांनी कोरोना टेस्टिंगची व्याप्ती वाढवावी. 70 टक्के RT-PCR टेस्ट झाल्या पाहिजेत. देशातील, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, परंतू चाचण्या वाढवायला हव्यात. योग्य पद्धतीने स्वॅब घेणे खूप गरजेचे आहे, तसेच त्याची चाचणी होणेदेखील खूप महत्वाचे आहे, असे मोदी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या