कोरोनामुळे यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्यात बदल; सहभागी होणाऱ्यांची संख्याही कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 06:50 IST2020-12-31T01:25:00+5:302020-12-31T06:50:49+5:30
या वर्षी फक्त २५ हजार लोकांनाच प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

कोरोनामुळे यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्यात बदल; सहभागी होणाऱ्यांची संख्याही कमी
नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात बदल करण्यात आले आहेत. दरवर्षी २६ जानेवारीला राजपथावर संचलन केले जाते. यंदा या संचलनाची लांबी कमी करण्यात आली आहे, तसेच या सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे.
या वर्षी फक्त २५ हजार लोकांनाच प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात येणार आहे. साधारणपणे या सोहळ्यात दरवर्षी एक लाखांच्या आसपास लोक सहभागी होत असतात, तसेच १५ वर्षांखालील मुलांना संचलन पाहण्यासाठी परवानगी मिळणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. संचलनात सहभागी होणाऱ्या सशस्त्र दल आणि निमलष्करी दलांच्या तुकड्यांमधील संख्याही मर्यादित असेल. या तुकड्यांमध्ये फक्त ९६ जणांचाच समावेश असेल.