कोरोना ठरतोय किडनीचा काळ, जाणून घ्या काय आढळलंय संशोधनात?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 10:35 AM2021-09-09T10:35:29+5:302021-09-09T10:36:17+5:30

३५ टक्के लोकांना दीर्घकाळपर्यंत त्रास

Corona is the age of the kidneys, find out what research has found? pdc | कोरोना ठरतोय किडनीचा काळ, जाणून घ्या काय आढळलंय संशोधनात?

कोरोना ठरतोय किडनीचा काळ, जाणून घ्या काय आढळलंय संशोधनात?

Next
ठळक मुद्दे. बहुतेकांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच आता कोरोना दीर्घकाळ राहिला तर त्याचा दुष्परिणाम किडनीच्या कार्यावर होतो, असे संशोधनात आढळून आले आहे. 

कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना त्यानंतरच्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे. बहुतेकांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच आता कोरोना दीर्घकाळ राहिला तर त्याचा दुष्परिणाम किडनीच्या कार्यावर होतो, असे संशोधनात आढळून आले आहे. 

काय आढळले संशोधनात?

nअमेरिकेतील मिसुरी राज्यातील सेंट लुई हेल्थकेअर सिस्टीम या संस्थेच्या चमूने कोरोनोत्तर परिणामांचे संशोधन केले. 
nकोरोनातून बरे झालेल्या ८९ हजार 
लोकांच्या डेटाचा अभ्यास त्यांनी केला. 
nकोरोनामुक्त झालेल्या लोकांना त्यानंतरच्या पहिल्या महिन्यात काय व्याधी जाणवल्या या मुद्द्यावर अभ्यासाचा भर होता. 
nकोरोनामुक्त झालेल्या लोकांपैकी ३५ टक्के लोकांना दीर्घकाळपर्यंत किडनीचा त्रास संभवतो, असे या अभ्यासात निदर्शनास आले. 

काय परिणाम होतो किडनीवर

nकोरोनामुळे किडनीच्या 
कार्यावर परिणाम होतो.
nपरिणाम बळावले तर किडनीचे कार्य थांबण्याचा धोकाही असतो. 
nकोरोनामुक्त झालेल्यांनी 
निदान सहा महिन्यांपर्यंत 
नियमितपणे वैद्यकीय तपासण्या करून घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
nरक्त शद्ध करणे हे किडनीचे 
मुख्य कार्य आहे.

कोणावर अधिक परिणाम?
कोरोनाकाळात ज्यांना दीर्घकाळपर्यंत रुग्णालयात दाखल व्हावे लागले 
त्यांना सर्वाधिक धोका आहे. 
ज्यांना कोरोनाचा मध्यम स्वरूपाचा संसर्ग झाला होता त्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे आढळलेल्यांमध्ये किडनीवर परिणाम झाले नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 
 

Web Title: Corona is the age of the kidneys, find out what research has found? pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.