शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हमारी अधुरी कहाणी! "तू माझ्या हृदयाच्या जवळ...", रूळावर सापडली संपलेली 'लव्ह स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 17:12 IST

odisha train accident news in marathi : ओडिशाच्या बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आले.

Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या रेल्वेअपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. या हृदयद्रावक घटनेनं अनेकांचं संसार मोडलं, काहींच्या पोटचा लेक तर कुणाचा 'बाप' हिरावला. अंगावर काटा आणणाऱ्या या दृश्यांनी सर्वांनाच संभ्रमात टाकलं. हा अपघात म्हणजे एक वाईट स्वप्न म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आजही यावर विश्वास ठेवणं कठीणच... खरं तर या अपघातानं एका प्रेमकहाणीचा देखील अंत झाला आहे, ज्याचे फोटो समोर आले आहेत. मृत व्यक्तीची डायरी रूळावर सापडली असून यामध्ये बंगाली भाषेत प्रेमाच्या कविता लिहल्या आहेत. 

दरम्यान, एका डायरीची पानं रूळावर सर्वत्र पडली होती. यामधील काही पानांवर मासे, सूर्य आणि हत्ती यांचे फोटो काढून प्रेम व्यक्त केले होते. एका प्रवाशाने त्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या प्रेमाच्या नावाने हे सर्व रेखाटलं असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या प्रवाशाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

"मला तुझ्यावर प्रत्येक क्षणी प्रेम प्रेम करायचंय" या पानांमध्ये बंगाली भाषेत काही चारोळ्या लिहल्या आहेत. "मला तुझ्यावर प्रत्येक क्षणी प्रेम करायचं आहे, तू माझ्या हृदयाच्या जवळ आहेस", असं बंगाली भाषेत लिहलेल्या कवितेत नमूद आहे. प्रेमाच्या या चारोळ्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या पानांना सांभाळून ठेवण्यात आले असून ही कोणी लिहली आहे याचा देखील शोध लागू शकला नाही.

२ जून रोजी झालेल्या या अपघातानं अनेकांना धक्का बसला. तब्बल २७५ जणांना जीव गमवावा लागला, तर १ हजारहून अधिक जण जखमी आहेत. बालेश्वर, कटक आणि भुवनेश्वर येतील इस्पितळात जखमींवर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातrailwayरेल्वेAccidentअपघातLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यू