स्वयंपाकाचा गॅस ६० रुपयांनी महाग! मध्य-पूर्वेतील संकटामुळे ग्राहकांवर आर्थिक बोजा; ११ महिन्यांत दुसरी दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 10:48 IST2026-03-08T10:46:49+5:302026-03-08T10:48:09+5:30

इराणविरोधात अमेरिका, इस्रायलने यांनी सुरू केलेल्या लष्करी कारवाईचे पडसाद थेट आपल्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले आहेत.

Cooking gas price hiked by Rs 60! Financial burden on consumers due to crisis in Middle East; Second price hike in 11 months | स्वयंपाकाचा गॅस ६० रुपयांनी महाग! मध्य-पूर्वेतील संकटामुळे ग्राहकांवर आर्थिक बोजा; ११ महिन्यांत दुसरी दरवाढ

स्वयंपाकाचा गॅस ६० रुपयांनी महाग! मध्य-पूर्वेतील संकटामुळे ग्राहकांवर आर्थिक बोजा; ११ महिन्यांत दुसरी दरवाढ

नवी दिल्ली : इराणविरोधात अमेरिका, इस्रायलने यांनी सुरू केलेल्या लष्करी कारवाईचे पडसाद थेट आपल्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले आहेत. तेल कंपन्यांनी घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या प्रति सिलिंडरच्या (वजन १४.२ किलो) किमतीत शनिवारी ६० रुपयांची वाढ केली. ही दरवाढ तत्काळ लागू करण्यात आली. गेल्या ११ महिन्यांत झालेली ही दुसरी दरवाढ आहे.

उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असलेल्या व २०१६ पासून मोफत एलपीजी कनेक्शन मिळालेल्या १० कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना देखील ही दरवाढ सहन करावी लागेल.

व्यावसायिक सिलिंडर ११४.५ रुपयांनी महागले

हॉटेल, रेस्टॉरंट आदी ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजी गॅसच्या १९ किलोच्या सिलिंडरची किंमत ११४.५ रुपयांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकारच्या सिलिंडरची किंमत १८८३ रुपये झाली आहे. १ मार्च रोजीच १९ किलो सिलिंडरच्या किमतीत २८ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

पेट्रोल, डिझेलच्या किमतीत तत्काळ वाढ होणार नाही

देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तत्काळ वाढ होण्याची शक्यता नाही, कारण सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडे जागतिक स्तरावर इंधन तेलाच्या वाढलेल्या किमतीचा भार पेलण्याची पुरेशी आर्थिक क्षमता आहे असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

कोणत्या शहरात आता किती दर?

कोलकाता: ९३९

चेन्नई: ९२८.५०

दिल्ली: ९१३

मुंबई: ९१२.५०

३१.८ दशलक्ष टन: २०२४-२५ मध्ये एलपीजीचा भारतातील वापर
१२.८ दशलक्ष टन: भारतात झालेले एलपीजीचे एकूण उत्पादन

८५ ते ९०%: आयात एलपीजीपैकी भारतात उपलब्ध असलेला साठा सौदी अरेबिया यासारख्या देशांकडून

चार जणांच्या कुटुंबावर प्रतिदिन ८० पैशांचा बोजा

दरवर्षी घरटी सरासरी ४ ते ५ सिलिंडर वापरले जातात असे गृहीत धरले तर चार जणांचे कुटुंब असलेल्या घरात दरवाढीचा बोजा दरदिवशी ८० पैसे किंवा प्रति व्यक्ती दर दिवशी २० पैसे इतकाच पडणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरापेक्षा भारतामध्ये एलपीजी अजूनही स्वस्त आहे.

Web Title : रसोई गैस की कीमतें बढ़ीं: मध्य पूर्व संकट के बीच ₹60 की वृद्धि

Web Summary : मध्य पूर्व तनाव के कारण घरेलू रसोई गैस की कीमतों में ₹60 प्रति सिलेंडर की वृद्धि हुई। वाणिज्यिक सिलेंडरों में भी महत्वपूर्ण वृद्धि देखी गई। पेट्रोल और डीजल की कीमतें फिलहाल स्थिर हैं, लेकिन एलपीजी की कीमतों में वृद्धि उज्ज्वला योजना के तहत आने वाले परिवारों सहित घरों को प्रभावित करती है, जिससे उन पर वित्तीय बोझ बढ़ जाता है।

Web Title : Cooking Gas Prices Soar: ₹60 Hike Impacts Consumers Amidst Crisis

Web Summary : Domestic cooking gas prices increased by ₹60 per cylinder due to Middle East tensions. Commercial cylinders also saw a significant hike. While petrol and diesel prices are currently stable, the LPG price rise affects households, including those under the Ujjwala scheme, adding to their financial burden.