अधिवेश्न-८
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:05+5:302015-03-20T22:40:05+5:30
एक कोटीपर्यंतचे खटले आता दिवाणी न्यायालयात

अधिवेश्न-८
ए कोटीपर्यंतचे खटले आता दिवाणी न्यायालयातमुंबई - एक कोटीपर्यंतचे खटले दिवाणी न्यायालयात चालविण्याची मुभा देणारे विधेयक गुरुवारी रात्री उशिरा विधानसभेत मंजूर करण्यात आले. कालानुरूप राज्याच्या शहरी व ग्रामीण भागातील मालमत्तांच्या दरात २0११ पासून प्रचंड वाढ झाली. त्या वेळी जिल्हा न्यायालयाच्या द्रव्यविषयक अपील अधिकारात २ लाख रुपयांवरून १0 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती आणि दाव्याच्या वादविषयक रक्कम किंवा किंमत दहा लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर पक्षकारांना उच्च न्यायालयात अपील दाखल करावे लागते. परिणामी उच्च न्यायालयात अपिलांची संख्या वाढू लागली. त्यातून सामान्य माणसांना न्याय मिळण्यास विलंब होऊ लागला. म्हणून जिल्हा न्यायालयाच्या द्रव्यविषयक अपील अधिकारीतेत दहा लाखांवरून एक कोटी रुपये इतकी वाढ करण्याच्या हेतूने हे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले.या विधेयकामुळे ज्या वादविषयांची रक्कम किंवा किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक नसेल अशी दिवाणी न्यायाधीश यांच्या आदेशातून उद्भवणारी अपिले विचारार्थ घेणे जिल्हा न्यायाधीशांना सोपे जाईल. ज्या वादविषयांची रक्कम किंवा किंमत १ कोटीपेक्षा अधिक असेल, अशा आदेशातून उद्भवणारी अपिले या विधेयकामुळे उच्च न्यायालयाकडून ऐकली जातील. यामुळे पक्षकारांच्या खर्चात बचत होईल, अशी भूमिका सरकारने विधानसभेत मांडली. (विशेष प्रतिनिधी)