भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार संतोख सिंह यांच्या झालेल्या मृत्यूवरून वाद, मुलाने केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 23:48 IST2023-01-14T23:48:23+5:302023-01-14T23:48:59+5:30
Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहोचली आहे. मात्र ही यात्रा जालंधर येथे पोहोचली असताना काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार संतोख सिंह यांच्या झालेल्या मृत्यूवरून वाद, मुलाने केले गंभीर आरोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रापंजाबमध्ये पोहोचली आहे. मात्र ही यात्रा जालंधर येथे पोहोचली असताना काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, त्यांच्या मृत्यूनंतर हल्का फिल्लौर येथील आमदार आणि संतोख सिंह यांचे पुत्र विक्रमजित चौधरी यांनी गंभीर आरोप केले आहेत.
आमदार विक्रमजित चौधरी म्हणाले की, रुग्णवाहिकेतून नेत असताना पंप केल्यावर माझे वडीस श्वास घेत होते. तेवढ्यात तिथे असलेल्या डॉक्टरांनी आम्हाला बाजूला होण्यास सांगितले. मात्र या डॉक्टरांकडे आणीबाणीच्या परिस्थितीत शॉक देण्यासाठी कुठलेही साहित्य नव्हते. तेथील डॉक्टर खूप गडबडीत होते. संतोख सिंह यांनी आयुष्यात केवळ डोळ्यांची शस्त्रक्रिया करवून घेतली होती. एवढंच नाही तर विक्रमजित चौधरींसह विरोधी पक्षांनीही या घटनेसाठी आम आदमी पक्षाला दोषी ठरवले आहे.
या घटनेबाबत भाजपाचे नेते आणि माजी मंत्री मनोरंजन कालिया यांनी सांगितले की, उपचारांमध्ये दिरंगाई झाली. त्यासाठी आम आदमी पक्ष जबाबदार आहे. संतोख सिंह यांना जर वेळीच वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांना वाचवता आले असते. राहुल गांधी यांच्या मागे जी रुग्णवाहिका चालत होती तिच्यामध्ये पुरेशी व्यवस्थाच नव्हती. याची थेट जबाबदारी आम आदमी पक्षाची आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची आहे.
कालिया पुढे म्हणाले की, किमान व्हीआयपींसाठी तरी पुरेशी व्यवस्था असली पाहिजे होती. जिथे झोपायची जागा होती, तिथे सामान पडलेले होते. तसेच डॉक्टर गडबडीत एकमेकांकडे पाहत होते. हे डॉक्टर अशा आणीबाणीसाठी प्रशिक्षित नव्हते.