खासगी फोटो शेअर केल्याने वाद, दोन महिला अधिकारी आमने-सामने, एकमेकींवर केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 15:48 IST2023-02-20T15:47:53+5:302023-02-20T15:48:32+5:30
Karnataka Women Officer clashed: कर्नाटकमध्ये आयएएस अधिकारी रोहिणी आणि आयपीएश अधिकारी डी. रूपा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे.

खासगी फोटो शेअर केल्याने वाद, दोन महिला अधिकारी आमने-सामने, एकमेकींवर केले गंभीर आरोप
कर्नाटकमध्ये आयएएस अधिकारी रोहिणी आणि आयपीएश अधिकारी डी. रूपा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. आयपीएस अधिकारी डी रूपा यांनी आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. रूपा यांनी रोहिणी सिंधुरी यांच्यावर १९ आरोप केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावरून रोहिणी यांच्यावर आरोप केले आहेत.
आयपीएस अधिकारी डी रूपा यांनी आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्यावर आरोप करताना सांगितले की, त्यांनी तीन आयएएस अधिकाऱ्यांना काही फोटो शेअर केले आहेत. रूपा यांनी रोहिणी यांच्यावर १९ आरोप करताना सांगितले की, त्या अनेक राजकारण्यांशी चर्चा करत आहेत. मी अनेक ठिकाणी वाचलंय की रोहिणी सिंधुरी यांनी आमदार महेश यांची भेट घेतली होती. कुठलाही आएएस अधिकारी आपल्या कर्तव्यावर असताना कुठल्याही आमदाराच्या किंवा राजकीय व्यक्तीच्या मिटिंगमध्ये गेल्याचं मी पहिल्यांदाच ऐकत आहे.
दरम्यान, रोहिणी सिंधुरी यांनी आयपीएस डी. रूपा यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, रूपा यांनी त्यांच्याविरुद्ध खोटी आणि वैयक्तिक मोहिम चालवत आहेत. भारतीय दंडविधानामधील विविध कलमांर्गत त्यांच्याविरोधात मी कारवाई करणार आहे. मला बदनाम करण्यासाठी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपस स्टेटसचे स्क्रीनशॉट घेतले आहेत. सिंधुरी यांनी पुढे सांगितले की, मी काही अधिकाऱ्यांना हे फोटो पाठवले आहेत. त्यांना त्या संबंधितांची नावे जाहीर करण्याचे आव्हान देतेय.
रूपा यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर रोहिणी सिंधुरी यांचे काही फोटो शेअर केले होते. तसेच त्यांनी २०२१ आणि २०२२ मध्ये आयएएस अधिकाऱ्यांसह कथितपणे फोटो शेअर केले होते. तसेच रूपा यांनी सिंधुरी यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.