शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Karunanidhi Death Update: ...म्हणून करुणानिधींच्या समाधी स्थळावरुन होतोय वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 9:46 AM

Karunanidhi Death: द्रमुक आणि अण्णाद्रमुकमधील वाद कोर्टात 

चेन्‍नई: पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीस्थळावरुन वाद सुरू आहे. करुणानिधी यांच्या दफनासाठी मरीना बीचवर जागा देण्यास राज्य सरकारनं असमर्थतता दर्शवली आहे. करुणानिधी यांचा दफनविधी मरीना बीचवर व्हावा, अशी मागणी द्रमुककडून करण्यात आली होती. त्यानंतर हा वाद मद्रास उच्च न्यायालयात गेला. सध्या या वादावर सुनावणी सुरू आहे. 

राहुल गांधींसह अनेकांकडून समर्थनराहुल गांधी, सीताराम येचुरी. डी. राजा यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी द्रमुकच्या मागणीचं समर्थन केलं आहे. करुणानिधी यांचा दफनविधी मरीना बीचवर व्हावा, अशी मागणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी अण्णा द्रमुक सरकारकडे केली आहे. 'जयललिता यांच्याप्रमाणेच करुणानिधीदेखील तामिळ जनतेचा आवाज होते. त्यामुळे त्यांच्याही दफनविधीसाठी मरीना बीचवर जागा देण्यात यावी,' असं राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

एम. के. स्टॅलिन यांनी केली होती मागणीमरीना बीचवर पार्थिवांवर अत्यंसंस्कार केले जाऊ नयेत, यासाठी दाखल करण्यात आलेली एक जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयातून मागे घण्यात आल्यानं हा वाद सुरू झाला. करुणानिधी यांचा अंत्यविधी मरीना बीचवर व्हावा, यासाठी करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना पत्र लिहिलं होतं. करुणानिधी यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द लक्षात घेता त्यांचा दफनविधी मरीना बीचवर व्हावा, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली. 

स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटस्टॅलिन यांनी वडिलांच्या निधनापूर्वी याबद्दल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांमुळे आणि कायदेशीर अडचणींमुळे मरीना बीचवर अत्यंसंस्कार करण्याची परवानगी देऊ शकत नाही, अशा आशयाचं पत्रक सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलं होतं. करुणानिधी निधनावेळी मुख्यमंत्रीपदावर नव्हते. त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मरीना बीचवर जागा देण्यास सरकार इच्छुक नसल्याची चर्चादेखील तामिळनाडूमध्ये आहे.  

रामचंद्रन आणि जयललिता यांचा दफनविधी मरिना बीचवरमाजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन आणि त्यांच्या निकटवर्तीय जयललिता यांचा दफनविधी  मरीना बीचवर झाला होता. या दोघांची स्मारकंदेखील मरीना बीचवर आहेत. रामचंद्रन आणि जयललिता यांचा अण्णा द्रमुक पक्ष सध्या तामिळनाडूत सत्तेत आहे. हे दोन्ही नेते करुणानिधी यांचे कट्टर विरोधक होते. करुणानिधी यांच्या पक्षाचे संस्थापक अण्णादुराई यांचा दफननिधी मरीना बीचवर झाला होता. त्यावेळी ते मुख्यमंत्रीपदावर होते.  

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीTamilnaduतामिळनाडूRahul Gandhiराहुल गांधी