शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

'चौकीदार चोर है' : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर राहुल गांधींनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 16:20 IST

'चौकीदार चोर है' असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन केल्या प्रकरणी अखेर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागितली आहे.

नवी दिल्ली -'चौकीदार चोर है' असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन केल्या प्रकरणी अखेर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागितली आहे. राफेल विमान करार प्रकरणात फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना राफेल विमान करारप्रकरणात 'चौकीदार चोर है' ही बाब सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केली आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्याविरोधात भाजपा नेत्या मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. राहुल गांधींविरोधात दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी राहुल गांधी यांच्या दिलगिरी व्यक्त करण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शपथपत्रात विरोधाभासी उल्लेख कसे काय आहेत? तसेच दिलगिरी व्यक्त करण्यासाठी 22 पानांचे शपथपत्र सादर करावे लागते का? अशी विचारणा केली. त्यानंतर राहुल गांधींचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या अशिलाच्या वतीने माफी मागितली. चौकीदार चोर है, हे वाक्य मी मी सर्वोच्च न्यायालाच्या न्यायमूर्तीच्या निर्णयाशी चुकीच्या पद्धतीने जोडले. ही माझी चुक आहे, असे अभिषेक मनू सिंघवी यांनी राहुल गांधींच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.  आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 मे रोजी होणार आहे. 

राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केलेल्या 'चौकीदार चोर है' या वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारात येणाऱ्या विषयांवर ओघात आपण 'चौकीदार चोर है' असे शब्द प्रयोग केले, मात्र ते चुकीच्या अर्थाने घेतले गेले असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाला दिले होते. मात्र या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफीच मागितली पाहिजे अशी मागणी मीनाक्षी लेखी यांच्या वकीलांनी केली होती.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRafale Dealराफेल डीलcongressकाँग्रेसBJPभाजपा