संवैधानिक संस्थांनी परस्पर सीमांचा आदर करायला हवा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:04 IST2025-05-02T09:03:28+5:302025-05-02T09:04:00+5:30
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या ‘चुनौतियां मुझे पसंद हैं’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना धनखड यांनी पहलगाममधील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला.

संवैधानिक संस्थांनी परस्पर सीमांचा आदर करायला हवा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन
लखनौ : जेव्हा प्रत्येक संस्था त्यांच्या अधिकारक्षेत्रात राहते, तेव्हाच त्यांच्यातील परस्पर आदर सुनिश्चित केला जाऊ शकतो, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गुरुवारी केले. संस्थांमधील संघर्ष समृद्ध लोकशाहीला चालना देत नाहीत असा इशारा त्यांनी दिला. धनखड यांनी यापूर्वी वक्फ सुधारणा कायद्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपावर जाहीर टीका केली होती.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या ‘चुनौतियां मुझे पसंद हैं’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना धनखड यांनी पहलगाममधील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला.
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
उपराष्ट्रपती म्हणाले की, अशा आव्हानांमध्ये राष्ट्राला एक म्हणून उभे राहावे लागते. राष्ट्र प्रथम हे नेहमीच आपले मार्गदर्शक तत्व असले पाहिजे. सर्वात गंभीर आव्हाने आतून उद्भवणारी असतात. सर्व संवैधानिक संस्था एकमेकांचा आदर करतात, हे आपले बंधनकारक कर्तव्य आहे आणि असा आदर तेव्हाच शक्य आहे, जेव्हा संस्था त्यांच्या संबंधित क्षेत्रात काम करतात. जेव्हा संघर्ष असतो तेव्हा लोकशाही फुलत नाही.
ते म्हणाले, "सर्वात धोकादायक आव्हाने ही आतून येणारी आव्हाने आहेत. त्यांची आपण उघडपणे चर्चा करू शकत नाही. त्यांचा कोणताही तार्किक आधार नाही.