शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सभापती धनखड यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार; हिवाळी अधिवेशनात येऊ शकताे प्रस्ताव, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 06:08 IST

धनखड यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार विरोधक करत आहेत. मात्र, राज्यसभेत विरोधकांकडे संख्याबळ नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि सपाच्या खासदार जया बच्चन यांच्यात झालेल्या शाब्दिक संघर्षांनंतर हे प्रकरण वेगळे वळण घेत आहे. धनखड यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार विरोधक करत आहेत. मात्र, राज्यसभेत विरोधकांकडे संख्याबळ नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

जया अमिताभ बच्चन प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यावरून सभागृहात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या आहेत. शनिवारीही सभापती धनखड आणि जया बच्चन यांच्यात खडाजंगी झाली.   सत्तारुढ पक्षाच्या खासदारांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरुद्ध व्यक्तिगत आक्षेप घेतल्यानंतर विरोधी पक्ष नाराज आहे. या खासदारांनी धनखड यांच्या कक्षात खरगे यांची माफी मागितली पण, सभागृहात नाही. 

सभापती धनखड यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मांडणे सोपे आहे. संसदेचे कामकाज १२ ऑगस्टऐवजी आजच तहकूब करण्यात आले. त्यामुळे आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच हा प्रस्ताव मांडता येईल. 

काय आहे प्रक्रिया?महाभियोग प्रस्ताव राज्यसभेत जर बहुमताने मंजूर झाला, तर तो लोकसभेकडे पाठवावा लागतो. १४ दिवस आधी नोटीस देऊन असा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. विरोधी पक्षांकडे राज्यसभेत सध्या बहुमत नाही, त्यामुळे असा प्रस्ताव फेटाळला जाऊ शकतो.

सद्य:स्थिती आणि शक्यता काय? -  सभापतींना राज्यसभेच्या सभापतीपदावरून तेव्हाच काढता येते, जेव्हा त्यांना उपराष्ट्रपतीपदावरून काढून टाकले जाते. कारण, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. -  तसेच, सभापतींना हटविण्यासाठी ठराव असला, तर कामकाजाच्या प्रलंबित कालावधीत त्यांना सभापती म्हणून काम करता येत नाही. मात्र, सभागृहाचा भाग असू शकतात. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसJaya Bachchanजया बच्चनSamajwadi Partyसमाजवादी पार्टी