शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'काँग्रेसचे हात रक्ताने माखले, त्यांच्यामुळेच मणिपूर जळतंय', हिमंता सरमा यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 07:41 IST

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, मणिपूर संघर्ष लष्कर आणि आसाम रायफल्सच्या मदतीने सोडवला जाऊ शकत नाही, पण कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी मणिपूर हिंसाचारावरुनकाँग्रेसवर आरोप केले. 'ईशान्येत काँग्रेसचे हात रक्ताने माखले आहेत आणि गेल्या ७५ वर्षांत त्यांच्या एकाही पंतप्रधानांनी या प्रदेशाच्या जखमेवर मलम लावलेला नाही. काल  संसदेत विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव  मांडला. यावेळी काँग्रेसने भाजपवर आरोप केले. या आरोपांना सरमा यांनी प्रत्युत्तर दिले. 

‘अविश्वास’वरून रंगले इंडिया Vs एनडीए युद्ध; राहुल गांधी बोलले नाहीत, सत्ताधाऱ्यांवर गुगली 

हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे ईशान्येत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. "काँग्रेसने आपल्या चुकीच्या धोरणांमुळे मणिपूर कसे जळत आहे, याचा विचार करायला हवा. त्याने ईशान्येत दुःखद परिस्थिती निर्माण केली.

मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून जातीय हिंसाचार सुरू आहे, यामध्ये सुमारे १६० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आसामचे मुख्यमंत्री म्हणाले, 'संपूर्ण ईशान्येत काँग्रेसने दुःखद परिस्थिती निर्माण केली आहे. समुदायांमध्ये भांडणे एका रात्रीत सुरू झालेली नाहीत.' त्यांनी निदर्शनास आणले की मणिपूरमध्ये वांशिक-आधारित संघर्ष पहिल्यांदाच घडत नाहीत आणि 'पूर्वीच्या संघर्षात हजारो लोक मारले गेले होते.' हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, १९९० पासून हा संघर्ष सुरू आहे. मणिपूर हळूहळू सामान्य स्थितीत परत येत आहे आणि मे महिन्याच्या तुलनेत आता परिस्थिती चांगली आहे, असंही ते म्हणाले. 

सरमा म्हणाले की, मणिपूर संघर्ष लष्कर आणि आसाम रायफल्सच्या मदतीने सोडवला जाऊ शकत नाही, पण कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. 'मी काँग्रेसला आवाहन करतो की, जगाची दिशाभूल करू नका. ईशान्येत जे काही घडत आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागावी. कोक्राझारमधील हिंसाचाराच्या वेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आसाम दौऱ्याबाबत काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी संसदेत वस्तुस्थिती 'योग्यरित्या' सांगावी. मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या अनेक महिन्यांपासून मौन बाळगल्यावर सरमा म्हणाले की, काहीवेळा मौन अधिक शक्तिशाली असते.'आम्ही गप्प बसलो कारण शब्दांनी मणिपूरमध्ये गदारोळ माजवला असता. गप्प बसल्याबद्दल मी केंद्र सरकारचा आभारी आहे, असंही सरमा म्हणाले. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसBJPभाजपा