शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Opinion Poll: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमळ कोमेजणार; तीन राज्यांचा काँग्रेसला 'हात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 20:40 IST

लोकसभा निवडणुकीआधी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला धक्का बसण्याची शक्यता

नवी दिल्ली: निवडणूक आयोगानं आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यातील भाजपाकडे असलेल्या तीन राज्यांमध्ये सत्तांतर होऊ शकतं, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत येऊ शकते, अशी सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी सांगते.मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत. यातील 122 जागा जिंकत काँग्रेस राज्यात सत्ता स्थापन करेल, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. तर सध्या सत्तेत असलेल्या भाजपाला 108 जागांवर समाधान मानावं लागेल. मात्र या दोन्ही पक्षांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच असेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. मध्य प्रदेशात भाजपाला 41.5 टक्के, तर काँग्रेसला 42.2 टक्के मतं मिळतील. 2013 मध्ये मध्य प्रदेशात भाजपाला 166 जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला 57 जागांवर यश मिळालं होतं. राजस्थानात भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागू शकतो, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थानात विधानसभेच्या 200 जागा आहेत. यापैकी 142 जागांवर विजय मिळवत काँग्रेस राजस्थान पुन्हा काबीज करेल, असं सर्वेक्षणातून समोर आलेले आकडे सांगतात. तर भाजपाला 56 जागांवर यश मिळू शकतं. या दोन्ही पक्षांच्या मतदानाच्या टक्केवारीतही मोठा फरक असू शकतो. काँग्रेसला राजस्थानात 49.9 टक्के मतं मिळू शकतात, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. तर भाजपाला 34.3 टक्के मतं मिळू शकतात. छत्तीसगडमध्येही भाजपाचं कमळ कोमेजण्याची शक्यता आहे. याठिकाणी भाजपाला 90 पैकी 40 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 47 जागांसह सत्ता स्थापन करता येऊ शकते. या राज्यात मध्य प्रदेशप्रमाणेच दोन्ही पक्षांच्या मतदानाची टक्केवारी जवळपास सारखी असेल, असं आकडे सांगतात. काँग्रेसला 38.9 टक्के, तर भाजपाला 38.6 टक्के मतं मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या छत्तीसगडमध्ये भाजपाचे 49, तर काँग्रेसचे 39 आमदार आहेत.  

टॅग्स :ElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थानChhattisgarhछत्तीसगडBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी