नवी दिल्ली : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये एकहाती मिळालेल्या विजयानंतर काँग्रेस पक्ष फ्रंटफूटवर डावपेच खेळत आहे. यामुळे 4 महिन्यांपूर्वी जिथे जिथे काँग्रेस आघाडीसाठी सहकारी शोधत होती आणि नंबर 2 ची जागा घेण्यास तयार होती तिथेही आता मोठ्या भावाच्या पावित्र्यात आली आहे. समसमान किंवा जास्तीच्या जागा मिळत असतील तर आघाडी अन्यथा एकट्याने लोकसभा निवडणूक लढविण्याचा बाणा काँग्रेसने स्वीकारला आहे.
उत्तर प्रदेशनंतर पश्चिम बंगालमध्येही काँग्रेसने एकट्यानेच लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर गेल्या विधानसभेला वेगवेगळे लढलेल्या महाराष्ट्रातही काँग्रेसने राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा वाटून घेतल्या आहेत. तर बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत आणि आंध्रमध्ये तेलगू देसमसोबत समसमान जागा वाटप होण्यासाठी प्रयत्नशील आहे. केवळ तामिळणाडूमध्ये काँग्रेस ताकद नसल्याने द्रमुकसोबत कमी जागांवर लढण्यास तयार झाली आहे. तेथे लोकसभेच्या 39 जागा आहेत. यापैकी काँग्रेस 8 तर द्रमुक 30 जागांवर लढणार आहे.
काँग्रेसच्या हातून उत्तर प्रदेश जरी गेले असले तरीही या पक्षाने सात मोठ्या राज्यांमध्ये आघाडी केली आहे. बिहार, जम्मू-काश्मीर, आंध्रमध्ये 2014 मध्ये काँग्रेसने नमते घेत दोन नंबरच्या जागा लढविल्या होत्या. आता काँग्रेसने 23 राज्यांमध्ये एकट्यानेच लोकसभा निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. यामधील 2-3 राज्ये अशी आहेत, जेथे काही छोटे पक्ष सहभागी झाले आहेत. या पक्षांची राष्ट्रीय स्तरावर ओळख शून्यच आहे. या 23 राज्यांमध्ये 354 जागा आहेत. म्हणजेच काँग्रेस एकून लोकसभेच्या 65 जागांवर एकटीच लढणार आहे.
माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी निधन झाले. सोमवारी काँग्रेसने कर्नाटकच्या कलबुर्गीमधून प्रचाराचे रणशिंग फुंकले. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून पर्रीकरांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर काही वेळाने पर्रीकर यांच्यावर शेजारील गोवा राज्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
| राज्य | जागा |
|---|---|
| यूपी | 80 |
| बंगाल | 42 |
| मध्यप्रदेश | 29 |
| राजस्थान | 25 |
| गुजरात | 25 |
| आंध्र प्रदेश | 25 |
| ओडिशा | 21 |
| केरळ | 20 |
| तेलंगाना | 17 |
| आसाम | 14 |
| पंजाब | 13 |
| हरियाणा | 10 |
| दिल्ली | 7 |
| जम्मू-कश्मीर | 6 |
| उत्तराखंड | 5 |