शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेसचे ‘अब होगा न्याय’; भाजपचे ‘फिर एक बार मोदी सरकार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 05:57 IST

महिला, शेतकरी, युवकांच्या कल्याणासाठी झटण्याचे आश्वासन; थीम साँग, व्हिडीओ, रिंग टोन आदी प्रचार साहित्य जारी

शीलेश शर्मा ।नवी दिल्ली : ‘अब होगा न्याय’ हेच आगामी लोकसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या प्रचाराचे घोषवाक्य असणार आहे. त्याचा संबंध केवळदेशातील सर्वात गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपयांची मदत देण्यापुरताच नाही, तर युवकांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण करणे, कृषिमालाला योग्य भाव मिळवून देणे, महिलांच्या सुरक्षेची काळजी घेणे अशा अनेक बाबींशी आहे. काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष आनंद शर्मा यांनी हे घोषवाक्य रविवारी जाहीर केले. स्टार्टअपसाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही, मोफत आरोग्यनिदान व उपचार, एका वर्षात २४ लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणार, १२वीपर्यंत मोफत शिक्षण, महिलांना ३३ टक्के आरक्षण, सुलभ जीएसटी पद्धती ही काँग्रेसची आश्वासने नमूद केलेली पोस्टर लावलेले हजारो ट्रक देशभर प्रचारासाठी फिरविण्यात येणार आहेत. 

‘हिंदुस्थान को न्याय दिलायेंगे, काँग्रेस की सरकार बनायेंगे’असा नाराही प्रचारात दिला जाईल. केवळ ट्रकच्याच नव्हे, तर रेडिओ, वृत्तपत्रे, समाजमाध्यमे यांच्याद्वारेही काँग्रेस आक्रमक प्रचार करणार आहे.प्रचारगीतांत बदलकाँग्रेसच्या प्रचारमोहिमेची आखणी सिल्व्हर पुश या संस्थेने केली आहे. लोकसभा काँग्रेसची प्रचारगीते कवी जावेद अख्तर व निखिल अडवाणी यांनी लिहिली आहे. गीतांतील काही उल्लेखांबद्दल आयोगाने आक्षेप घेतले होते. त्यात गीतांमध्ये योग्य ते बदल काँग्रेसकडून केले आहेत.गेल्या पाच वर्षांतील कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना सत्तेवर आणण्याचे मतदारांना आवाहनकरणे, हा आमच्या प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू असेल, असे भाजपने रविवारी जाहीर केले. पक्षाचा निवडणूक जाहीरनामा कदाचित सोमवारी प्रसिद्ध केला जाईल, असे संकेतही पक्षाने दिले.केंद्रीय वित्तमंत्री व पक्षाचे प्रचार विभागाचे प्रमुख अरुण जेटली यांनी एका पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकीत ‘फिर एकबार मोदी सरकार’ ही पक्षाच्या प्रचाराची टॅगलाइन असेल, असे सांगितले. जेटली यांनी पक्षाचे ‘थीम साँग’ व दृष्य प्रचाराचेप्रमुख साहित्य, तसेच प्रचारासाठी तयार केलेले व्हिडीओही जारी केले. याखेरीज मोबाइलवर रिंगटोन म्हणून वापरता येईल, असा छोटेखानी प्रचारी संदेशही पक्षाने तयार केला आहे.‘फिर से मोदी सरकार बनाते है, फिरसे कमल खिलाते है’, हेपक्षाचे प्रचारातील ‘थीम साँग,’ असेल असेही जेटली यांनी सांगितले. ‘आम्हाला ११ खेळाडू आणि ४० कर्णधार असलेले नव्हे, तर एकच कर्णधार असलेले सरकार हवे आहे,’ असे जेटली म्हणाले. भाजपने प्रचाराचे साहित्य बनविण्याचे काम एजन्सीला न देता ‘इन हाउस’ पद्धतीनेच केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा