शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी काँग्रेस गंभीर नव्हती; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 11:54 IST

विराधकांना सत्य पचविणे जातेय जड, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे.  

नवी दिल्ली : संसदेत महिलांना आरक्षण देण्याच्या विषयाबाबत काँग्रेस कधीच गंभीर नव्हती. या विषयाबाबत काँग्रेसने फक्त गप्पाच मारल्या अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.

नारीशक्ती वंदन विधेयकासंदर्भात अमित शाह म्हणाले की, काँग्रेसमुळे महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात येऊ शकले नाही. काँग्रेसच्या मित्रपक्षांनी हे विधेयक सभागृहात कसे मांडले जाणार नाही याकडे अधिक लक्ष दिले. महिलांना आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक संसदेत मोदी सरकारने मांडल्यानंतर देशभरात आनंद व्यक्त करण्यात आला. 

‘त्या’ क्षणाचा भाग बनल्याचा गर्व सरकार ज्या क्षणी महिलांना भारताच्या भविष्यात समान वाटा देईल, त्या क्षणाचा आपण एक भाग असल्याचा गर्व वाटेल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार खोलवर रुजलेली विषमता दूर करून आम्हा सर्व महिलांना भारताच्या भविष्यात समान वाटा देईल तेव्हा त्या क्षणाचा भाग बनल्याचा मला गर्व वाटेल, असे  भाजप खासदार मनेका गांधी म्हणाल्या.

हे तर मोठे पाऊल या निर्णयाचे स्वागत. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या कठीण राजकीय क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण केल्यानंतर आता महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात साकार होणार आहे हे पाहून मला आनंद होत आहे. अर्धी लोकसंख्या असूनही आमचे प्रतिनिधित्व खूपच कमी आहे. मेहबूबा मुफ्ती, अध्यक्ष, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी. 

५० टक्के आरक्षण हवे केंद्र सरकारने लोकसंख्या लक्षात घेऊन महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा विचार केला पाहिजे. आमच्या पक्षाला आशा आहे की, यावेळी चर्चेनंतर हे महिला आरक्षण विधेयक निश्चितपणे मंजूर होईल. - मायावती, अध्यक्ष, बसपा

विधेयकाचे स्वागत महिला आरक्षण विधेयकाचे स्वागत आहे. मी उत्साहित आहे, मी खूप आनंदी आहे. पण, थोडी काळजीही आहे. त्याचे प्रारूप काय असेल. २००८ मध्ये राज्यसभेत मंजूर झालेले तेच विधेयक असेल का? के. कविता,  विधान परिषद सदस्य, बीआरएस. 

अमित शाह यांनी सांगितले की, अमित शाह यांनी सांगितले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे हे या विधेयकाच्या निमित्ताने सर्वांना दिसून आले. मात्र, विरोधी पक्षांना हे सत्य पचविणे जड जात आहे. महिला आरक्षणाबाबत काँग्रेसने श्रेय लाटण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या पक्षाची दुतोंडी भूमिका यापुढे लपून राहणे शक्य नाही. 

आजचा दिवस ऐतिहासिक आहे. अनेक सरकारे आली, त्यांनी प्रयत्ने केले, परंतु यश आले नाही. आता केंद्र सरकारने हे विधेयक लोकसभेत सादर केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांसाठी अनेक गोष्टी केल्या, त्यापैकी ही एक आहे. हे महिलांसाठी एक मोठे पाऊल आहे - ईशा गुप्ता, अभिनेत्री

हे विधेयक आमचे : सोनिया गांधी महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या की, हे विधेयक आमचे आहे. संसद परिसरात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणले जात आहे. आपली ही मागणीही होती, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, हे विधेयक आमचे आहे.

टॅग्स :ParliamentसंसदAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेसWomen Reservationमहिला आरक्षण