शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

मोदींच्या गुजरातमधून काँग्रेसने फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 06:21 IST

प्रचंड जाहीर सभेत मोदी, भाजपा व संघावर टीकास्त्र

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून मंगळवारी कार्यकारिणीची बैठक व जाहीर सभा घेऊन काँग्रेसनेलोकसभा निवडणुकांचे जोरदार रणशिंग फुंकले. या कार्यकारिणीमध्ये भाजपा, रा.स्व. संघ आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. मात्र, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी त्यांचे जाहीर सभेतील भाषण हे जनतेसाठी आकर्षण होते. काँग्रेसच्या गुजरातमधील जाहीर सभेला बऱ्याच वर्षांनी इतकी प्रचंड गर्दी झाली होती.प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारने दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे व प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन पाळले नसल्याची आठवण करून दिली. मोदी यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत आणि द्वेषाच्या राजकारणातून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, महत्त्वाच्या संस्था, यंत्रणा यांना कमकुवत करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्याचा जाब जनतेने त्यांना विचारावा.महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमातूनच स्वातंत्र्याची चळवळ उभारली होती, याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, आताही आपल्याला पुन्हा स्वातंत्र्यासाठीच लढावे लागणार आहे. गांधीजींनी दिलेल्या स्वातंत्र्यानंतर ‘मत’ नावाचे शस्त्र आपल्या हाती आले आहे. तुमचे एक मत हे मोठे शस्त्र आहे. कोणालाही न दुखावता, शारीरिक नुकसान न करता आश्वासने पूर्ण न करणाºया मोदी सरकारला या शस्त्राने त्यांची जागा दाखवून द्या. गांधीजींनी १२ मार्च, १९३0 रोजी सुरू केलेल्या दांडी मार्चच्या वर्धापन दिनी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत व जाहीर सभेत सरदार पटेल यांचेही स्मरण करण्यात आले. या वेळी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते काँग्रेसतर्फे जामनगर मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे सांगण्यात येत आहे.राजकारणात येताच घणाघाती भाषणदिलेली आश्वासने पूर्ण का केली नाहीत, हा सवाल जनतेने आता मोदी सरकारला विचारायला हवा. पुढील दोन महिनेही खोटी आश्वासने देण्यात येतील, पण मतदारांनी अशा लोकांपासून दूर राहावे. - प्रियांका गांधीडॉ. मनमोहन सिंह रिंगणात नाहीतमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पंजाबमधून लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी विनंती पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह व प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी त्यांना केली होती, पण प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी नकार दिला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीGujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस