शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

"मुलींवर अत्याचार करणारे भाजपचेच लोक का असतात?" जयराम रमेश यांचा PM मोदींना सवाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 1:33 PM

''मुलींवर अत्याचार करणाऱ्या भाजप नेत्यांची यादी न संपणारी आहे.''

Congress Targets PM Modi: भारतीय कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटू यांच्यातील वाद वाढत आहे. बुधवारी दिवसभर खेळाडूंनी डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले. आजही हे आंदोलन सुरुच आहे. यावरुन काँग्रेसने केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. ''मुलींवर अत्याचार करणाऱ्या भाजप नेत्यांची यादी न संपणारी आहे,'' अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली.

पंतप्रधानांनी उत्तर द्यावं...जयराम रमेश यांनी ट्विट केले की, "कुलदीप सेंगर, चिन्मयानंद, पिता-पुत्र विनोद आर्य-पुलकित आर्य....आणि आता हे नवीन प्रकरण! मुलींवर अत्याचार करणाऱ्या भाजप नेत्यांची यादी न संपणारी आहे. 'बेटी बचाओ' हा मुलींना भाजप नेत्यांपासून संरक्षण देण्याचा इशारा होता का? पंतप्रधानांनी उत्तर द्यावं...''

आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणतात की, "पंतप्रधान महोदय, मुलींचा छळ करणारे सगळे भाजपचे लोक का आहेत? काल तुम्ही म्हणालात की देशात खेळांसाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे. हेच चांगले वातावरण आहे का, ज्यात देशाचे नाव उंचावणाऱ्या मुलीच सुरक्षित नाहीत?" असे ट्विट रमेश यांनी केले.

'कुस्ती संघटना बरखास्त करावा'काँग्रेसचे राज्यसभा खासदार दीपेंद्र हुड्डा यांनीही महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, "एक नागरिक म्हणून मी ही मागणी करत आहे... सरकारने ताबडतोब आमच्या खेळाडूंच्या सन्मानासाठी करावे. कुस्ती संघटना बरखास्त करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. हा एका राज्याचा विषय नाही. खेळाडू वेगवेगळ्या राज्यांतून येतात. तपास सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवा,''  अशी मागणी त्यांनी केली.

'भाजप-जेजेपी सरकार गप्प का?'दीपेंद्र हुड्डा यांनीही ट्विटरवरुन हरियाणाच्या भाजप-जेजेपी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले, "सरकार पालक आहे! परंतु आतापर्यंत हरियाणा सरकारचे इतक्या गंभीर प्रकरणात मौन आश्चर्यकारक आणि अस्वस्थ करणारे आहे. देशाचा नावलौकिक मिळवून देणारे हे खेळाडू आहेत. खेळाडूंवर एवढा अन्याय होतोय, तरीदेखील भाजप-जेजेपी सरकार गप्प आहे."

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीWrestlingकुस्ती