"मुलींवर अत्याचार करणारे भाजपचेच लोक का असतात?" जयराम रमेश यांचा PM मोदींना सवाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 01:33 PM2023-01-19T13:33:12+5:302023-01-19T13:34:02+5:30

''मुलींवर अत्याचार करणाऱ्या भाजप नेत्यांची यादी न संपणारी आहे.''

Congress Targets PM Narendra Modi: "Why are BJP people abuse girls?" Jairam Ramesh's question to PM Modi | "मुलींवर अत्याचार करणारे भाजपचेच लोक का असतात?" जयराम रमेश यांचा PM मोदींना सवाल...

"मुलींवर अत्याचार करणारे भाजपचेच लोक का असतात?" जयराम रमेश यांचा PM मोदींना सवाल...

Next

Congress Targets PM Modi: भारतीय कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटू यांच्यातील वाद वाढत आहे. बुधवारी दिवसभर खेळाडूंनी डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले. आजही हे आंदोलन सुरुच आहे. यावरुन काँग्रेसने केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. ''मुलींवर अत्याचार करणाऱ्या भाजप नेत्यांची यादी न संपणारी आहे,'' अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली.

पंतप्रधानांनी उत्तर द्यावं...
जयराम रमेश यांनी ट्विट केले की, "कुलदीप सेंगर, चिन्मयानंद, पिता-पुत्र विनोद आर्य-पुलकित आर्य....आणि आता हे नवीन प्रकरण! मुलींवर अत्याचार करणाऱ्या भाजप नेत्यांची यादी न संपणारी आहे. 'बेटी बचाओ' हा मुलींना भाजप नेत्यांपासून संरक्षण देण्याचा इशारा होता का? पंतप्रधानांनी उत्तर द्यावं...''

आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणतात की, "पंतप्रधान महोदय, मुलींचा छळ करणारे सगळे भाजपचे लोक का आहेत? काल तुम्ही म्हणालात की देशात खेळांसाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे. हेच चांगले वातावरण आहे का, ज्यात देशाचे नाव उंचावणाऱ्या मुलीच सुरक्षित नाहीत?" असे ट्विट रमेश यांनी केले.

'कुस्ती संघटना बरखास्त करावा'
काँग्रेसचे राज्यसभा खासदार दीपेंद्र हुड्डा यांनीही महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, "एक नागरिक म्हणून मी ही मागणी करत आहे... सरकारने ताबडतोब आमच्या खेळाडूंच्या सन्मानासाठी करावे. कुस्ती संघटना बरखास्त करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. हा एका राज्याचा विषय नाही. खेळाडू वेगवेगळ्या राज्यांतून येतात. तपास सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवा,''  अशी मागणी त्यांनी केली.

'भाजप-जेजेपी सरकार गप्प का?'
दीपेंद्र हुड्डा यांनीही ट्विटरवरुन हरियाणाच्या भाजप-जेजेपी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले, "सरकार पालक आहे! परंतु आतापर्यंत हरियाणा सरकारचे इतक्या गंभीर प्रकरणात मौन आश्चर्यकारक आणि अस्वस्थ करणारे आहे. देशाचा नावलौकिक मिळवून देणारे हे खेळाडू आहेत. खेळाडूंवर एवढा अन्याय होतोय, तरीदेखील भाजप-जेजेपी सरकार गप्प आहे."

Web Title: Congress Targets PM Narendra Modi: "Why are BJP people abuse girls?" Jairam Ramesh's question to PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.