शिलॉंग : मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आता कॉंग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे. कॉंग्रेसच्या चार आमदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.भाजपामध्ये प्रवेश करण्याआधीच कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन पक्षासमोर नवे संकट उभे केले होते. विशेष म्हणजे या पाच आमदारांमध्ये माजी उपमुख्यमंत्री रॉवेल लिंगडोह यांचा समावेश आहे. दरम्यान, मेघालय भाजपाचे अध्यक्ष शिबून लिंगदोह आणि भाजपाचे सरचिटणीस (ईशान्य भारताचे प्रभारी) राम माधव यांच्या उपस्थितीत या आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
मेघालयात काँग्रेसला झटका, चार आमदारांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 16:07 IST
मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आता कॉंग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे. कॉंग्रेसच्या चार आमदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
मेघालयात काँग्रेसला झटका, चार आमदारांचा भाजपात प्रवेश
ठळक मुद्देमेघालय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग कॉंग्रेसच्या चार आमदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेशशिबून लिंगदोह आणि राम माधव यांच्या उपस्थितीत आमदारांचा प्रवेश