शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अमेठीत काँग्रेसला मोठा झटका, स्मृती इराणींच्या उपस्थितीत विकास अग्रहरी यांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 14:53 IST

Lok Sabha Elections 2024 : विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

अमेठी : लोकसभा निवडणुकीपूर्वी अमेठीतकाँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश सहसंयोजक विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्षांनी विकास यांचा पक्षात समावेश केला. युवा वर्गात मजबूत पकड असलेले विकास अग्रहरी यांची जिल्ह्यात दमदार वक्ता म्हणून ओळख आहे. विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी २६ एप्रिलनंतर अमेठीत येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकडे अमेठीतील काँग्रेस दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. अमेठी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराची प्रक्रिया सुरूच आहे. विकास अग्रहरी यांचा केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांच्या निवासस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम प्रसाद मिश्रा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. जगदीशपूर विधानसभेच्या राणीगंज बाजारपेठेतील रहिवासी विकास अग्रहरी हे खंबीर प्रवक्ते म्हणून ओळखले जात होते. 

भाजपाचे जिल्हा प्रवक्ते चंद्रमौली सिंह म्हणाले की, अमेठीतील सर्व सामान्य जनता स्मृती इराणी यांच्यासोबत आहे. गेल्या १० वर्षात स्मृती इराणी यांनी अमेठीशी बांधलेले नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. यामुळेच लोक आता काँग्रेस सोडून भाजपामध्ये येत आहेत. दरम्यान, भाजपाचे सदस्यत्व स्वीकारताना विकास अग्रहरी म्हणाले की, स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखाली अमेठीचा प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे.

हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य - राहुल गांधीभाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले आहे. दरम्यान,राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील अमेठीमधून निवडणूक लढवली होती. मात्र अमेठीमधून त्यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. तर राहुल गांधी हे वायनाडमधून निवडून आले होते. 

अमेठीबाबत काँग्रेसचा अद्याप सस्पेंस  यंदाच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने राहुल गांधींना वायनाडमधून उमेदवारी दिली आहे. मात्र अमेठीबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या पराभवापूर्वी अमेठी ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात होती. कारण राहुल गांधी यांनी २००४, २००९ आणि २०१४ मध्ये या जागेवरून लोकसभा निवडणूक जिंकली होती. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींना उमेदवारी दिली जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाamethi-pcअमेठीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधी