"भारतीयांपेक्षा अधिक लसी परदेशात पाठवल्याची कबुली सरकारनं UN समोर दिलीये, पण जर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 18:35 IST2021-03-27T18:32:28+5:302021-03-27T18:35:56+5:30
Coronavirus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरून मोदी सरकारवर साधला निशाणा

"भारतीयांपेक्षा अधिक लसी परदेशात पाठवल्याची कबुली सरकारनं UN समोर दिलीये, पण जर..."
वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाहाधितांची संख्या ही तब्बल १२ कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान पुन्हा चिंताजनक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. दरम्यान, भारतात लसीकरणालाही सुरूवात झाली आहे. परंतु भारताकडून अन्य देशांनाही मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा केला जातोय. या धोरणावरून काँग्रेसनं भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
"भारतानं आपल्या देशातील नागरिकांना जितके कोरोना लसीचे डोस दिले नाही त्यापेक्षा अधिक डोस परदेशांमध्ये निर्यात केलेत, असं भाजपा सरकारनं संयुक्त राष्ट्रासमोर कबुल केलं आहे. लसी निर्यात करण्यापेक्षा भारतीयांना प्राधान्य देत सरकारनं लसीकरण केलं असतं तर सध्या देशात दिसणारी कोरोनाची दुसरी लाट रोखता आली असती," अशी जोरदार टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शामा मोहम्मद यांनी केली आहे.
India supplied more COVID-19 vaccines globally than it has vaccinated its own people, the BJP govt admits to UN. Had the govt prioritised vaccinations for Indian citizens first instead of focusing on exports, the deadly second wave the country is facing could have been avoided.
— Dr. Shama Mohamed (@drshamamohd) March 27, 2021
रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी झाला
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्स १ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत लागू होणार आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा ५०४ दिवसांवरून २०२ दिवसांवर आला आहे. १ मार्चला हा कालावधी ५०४ दिवस होता तो आता २३ मार्चला तो २०२ दिवस झाला आहे.