शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सोमवारच्या भारत बंदवरून काँग्रेसमध्येच फाटाफूट? गोव्यात बंद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 16:27 IST

चतुर्थीच्या खरेदीवर परिणाम होत असल्याने गोवा काँग्रेसचा निर्णय

मडगाव : इंधनाच्या आणि स्वयंपाक गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने सोमवार 10 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. मात्र, या निर्णयावरून पक्षातच फाटाफूट दिसून येत आहे. भारत बंदमध्ये गोव्यातील काँग्रेस पक्ष सहाभागी होणार नसल्याचे काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. 

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे खरेदीसाठी गावागावातून लोक येणार आहेत. त्यांना त्रास होऊ नये म्हणून गोव्यामध्ये बंद पाळला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 चोडणकर म्हणाले, गणेशोत्सव हा गोवेकरांचा मुख्य सण आहे. या सणासाठी तीन-चार दिवस आधी खरेदी सुरु होते. या सणाचे महत्व लक्षात घेऊन गोव्यातील काँग्रेस बंदमध्ये भाग घेणार नाही. या उलट सोमवारी या इंधनवाढी विरोधात आम्ही लोकांमध्ये जागृती करु.13 सप्टेंबर रोजी चतुर्थीचा सण असून 12 सप्टेंबरपासून या सणाच्या धार्मिक विधी गोव्यात सुरु होतील. चतुर्थी हा महत्वाचा सण असल्याने गोव्यात त्या दिवसात बाजारपेठांनाही तेजी आलेली असते. अशा परिस्थितीत बंदची हाक दिल्यास लोकांना त्रास होईल. यासाठीच काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार हे गोव्यात आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने स्थानिक भाजपा सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला असला तरी सोमवारी बंद पाळल्यास लोकांची सहानुभूती काँग्रेसपासून दूर जाण्याची शक्यता असल्यानेच हा बंद पाळला जाऊ नये अशी विनंती विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनीही केल्याचे समजते.

गोव्यात बंद पाळण्याऐवजी काँग्रेस पक्ष सर्व पेट्रोल पंपवर पत्रके वाटून  लोकांमध्ये जागृती करणार आहे, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना  सांगितले. 

यावेळी प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य सुभाष फळदेसाई हेही उपस्थित होते. सका़ळी 9 ते 10 या वेळेत राज्यातील एकूण एक पेट्रोलपंपवर काँग्रेस कार्यकर्ते ही मोहीम राबवतील व सरकार इंधनाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यास कसे अपयशी ठरले आहे ते लोकांना पटवून देईल. ते म्हणाले की, 2014  मध्ये संपुआ सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 52 रु. लिटर, डिङोलचे 47 रु. तर गॅसचा दर 380 रु. होता. पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचे सावट असताना हे दर गगनाला भिडलेले आहेत व त्याचा सर्वाधिक झळ सर्वसामान्यांना बसत आहे, असा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदgoaगोवाcongressकाँग्रेसPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपInflationमहागाई