शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

मोदींनी तर देशाचाच ऍक्सिडंट केला; 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्या ट्रेलरवरून काँग्रेसचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 15:45 IST

चित्रपटातील संवादांबद्दल काँग्रेसला आक्षेप; सत्यजित तांबे कोर्टात जाणार

मुंबई: 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटाविरोधात काँग्रेस न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे. या चित्रपटातील अनेक संवादांवर काँग्रेसनं आक्षेप नोंदवला. या चित्रपटाविरोधात न्यायालयात जाणार . मनमोहन सिंगपंतप्रधान असताना काँग्रेस हायकमांडकडे असलेला रिमोट कंट्रोल, एकापाठोपाठ एक बाहेर येणारे घोटाळे, या परिस्थितीमधील सिंग यांची अगतिकता या चित्रपटाच्या ट्रेलरमधून दाखवण्यात आली आहे. 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्या ट्रेलरमधील अनेक संवादांवर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधानमनमोहन सिंग आणि काँग्रेसची बदनामी करणारा असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. राजकीय फायद्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचा दावादेखील त्यांनी केला. 'लोकसभा निवडणूक जवळ आहे. त्यामुळे दुसऱ्याला बदनाम करून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा हा प्रकार आहे. ज्या मनमोहन सिंग यांना ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हटलं जातंय, त्यांनी अतिशय अवघड स्थितीतून देशाला बाहेर काढलं. त्यांच्या काळात देशाची सर्वांगीण प्रगती झाली. मात्र आताच्या पंतप्रधानांनी देशाचाच ऍक्सिडंट केला,' अशा शब्दांमध्ये सावंत यांनी थेट मोदींवर निशाणा साधला. स्वत:ला मोठं होता येत नसेल, तर दुसऱ्याला लहान दाखवलं जातं, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट, असा टोलादेखील त्यांनी लगावला. 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटात अभिनेते अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. खेर यांनी मनमोहन सिंग यांची भूमिका अतिशय सक्षमपणे सांभाळल्याचं ट्रेलरमधून दिसत आहे. तर अभिनेता अक्षय खन्नानं सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारुंची व्यक्तिरेखा साकारली आहे. संजय बारु मे २००४ ते ऑगस्ट २००८ या कालावधीत सिंग यांचे माध्यम सल्लागार आणि प्रमुख प्रवक्ते होते. त्यांनी लिहिलेल्या 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकावरुन चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. विजय गुट्टे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानManmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेसBJPभाजपा