शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं; काँग्रेसचं मोदींना प्रत्युत्तर, फोटो ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 11:00 IST

Congress Slams Narendra Modi : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आता नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि विकसित देशाच्या निर्माणाचा वज्रनिर्धार व्यक्त केला. २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करून द्यायची असून त्यासाठी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि निष्पक्षपात या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. तसेच भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगूलचालन या तीन वाईट प्रवृत्तींमुळे देशाचा विकास खोळंबला होता, असा दावाही मोदी यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसला देखील टोला लगावला. 

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आता नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत निशाणा साधला आहे. "मोदीजी भ्रष्टाचारावर बोलत होते..." असं म्हणत काही नेत्यांचे फोटो ट्विट केले आहेत. यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, नारायण राणे, हसन मुश्रिफ यांच्यासह जय पांडा, हिमंता बिश्व सरमा, सुवेंदु अधिकारी, शिवराज सिंह चौहान, बीएस बोम्मई, रघुवर दास, पेमा खांडू यांचे फोटो देखील आहेत.

पंतप्रधानांनी देशवासीयांमध्ये एक मजबूत राष्ट्रनिर्मितीची पूरेपूर क्षमता असून केवळ भ्रष्टाचार, घराणेशाहीचे राजकारण आणि लांगूलचालन हे या मार्गावरील मुख्य अडथळे होते. गेल्या ७५ वर्षांत काही विकृती समाजात निर्माण झाल्या असून त्यांचा समूळ नायनाट करणे हे आपल्या सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.

परिवारवाद आणि घराणेशाही हे सामाजिक न्यायाच्या प्रतिभेचे शत्रू आहेत, ते गरीबांची क्षमता नाकारतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. म्हणूनच या देशातील लोकशाहीच्या बळकटीसाठी कुटुंबवादापासून मुक्ती मिळणे आवश्यक आहे. सर्वजन हिताचा आणि सर्वजन सुखाचा हक्क प्रत्येकाला मिळायला हवा. त्यामुळे सामाजिक न्यायाचीही गरज आहे. तुष्टीकरणाने सामाजिक न्यायाची सर्वात मोठी हानी केली आहे. कोणी सामाजिक न्याय नष्ट केला असेल, तर या तुष्टीकरणाच्या विचारसरणीने, तुष्टीकरणाच्या राजकारणाने, तुष्टीकरणाच्या योजनांनी सामाजिक न्यायाचा घात केला आहे. भ्रष्टाचार हा विकासाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे मोदी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसCorruptionभ्रष्टाचार