congress senior leader p chidambaram slams health minister dr harshvardhan maharastra corona vaccine supply | Coronavirus : "केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करून प्रश्न विचारा की, महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात..."

Coronavirus : "केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करून प्रश्न विचारा की, महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात..."

ठळक मुद्देराज्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र झाली बंदकेंद्राकडून लसींचा मुबलक पुरवठा होत नसल्याचा राज्य सरकारचा आरोप

महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा योग्यरित्या होत नसल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून आता त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी जनतेत भीतीचं वातावरण निर्माण करत असल्याचं म्हणत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही बाब नाकारली होती. परंतु आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे महाराष्ट्राच्या समर्थनार्थ उतरले असून त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांवर टीका केली आहे. 

"केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना एका आरशासमोर उभं करून प्रश्न विचारला पाहिजे की काय केंद्रानं महाराष्ट्राला योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा केला आहे का? लसीकरणाच्या मोहिमेत होत असलेल्या गडबडीचं जबाबदार केंद्र सरकार आहे. ज्यामध्ये लसींचा मुबलक प्रमाणात पुरवठा न होणंदेखील सामील आहे," असं चिदंबरम म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना निशाणा साधला. चिदंबरम यांच्याकडून महाराष्ट्राचं समर्थन

"केंद्र करोना विषाणूचा प्रादुर्भावावर महाराष्ट्रातील तथ्यांकडे दुर्लक्ष करून लक्ष्य करत आहे. महाराष्ट्रानं ८० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. जवळपास २० राज्ये महाराष्ट्रापेक्षा मागे आहेत," असं चिदंबरम म्हणाले. 
महाराष्ट्रात फ्रन्टलाईन कर्मचाऱ्यांचं ७३ टक्के लसीकरण करण्यात आलं आहे. केवळ पाच राज्यांनी यात चांगली कामगिरी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण करण्यातही महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे. हे तथ्य असून ते केंद्रीय आरोग्यमत्र्यांच्या वक्तव्यातीलच असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: congress senior leader p chidambaram slams health minister dr harshvardhan maharastra corona vaccine supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.