शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये काँग्रेसच्या नेत्याला बेदम मारहाण, झाले गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 08:51 IST

Crime News: राजस्थानमधील बीकानेरमध्ये एका काँग्रेस नेत्याला काही गुंडांनी भररस्त्यात बेदम मारहाण केली. गुंडांनी बीकानेरमधील नोखाचे ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष मेघ सिंह यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली.

जयपूर - राजस्थानमधील बीकानेरमध्ये एका काँग्रेस नेत्याला काही गुंडांनी भररस्त्यात बेदम मारहाण केली. गुंडांनी बीकानेरमधील नोखाचे ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष मेघ सिंह यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत  मेघ सिंह गंभीर जखमी झाले. त्यांना बीकानेरमधील पीबीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांना झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणीत सिंह यांच्या पायाला १० फ्रॅक्चर झाले. या संदर्भात गुरुवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

मिळलेल्या माहितीनुसार नोखाचे ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष मेघ सिंह गुरुवारी कुटुंबासह देशनोक करणी माताजींचे दर्शन घेऊन माघारी फिरत होते. यादरम्यान, बीकानेर-नोखा रस्तेमार्गावर हिंमतसर गावामध्ये गुंडांनी त्यांची कार मेघ सिंह यांच्या कारसमोर लावून कारसमोर जबरदस्तीने थांबवली. त्यानंतर हल्लेखोरांनी मेघ सिंह यांना कारमधून जबरदस्तीने खेचून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली. जमीनीवर पडलेले सिंह आपल्या बचावासाठी हातपाय मारत होते. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर कुठलीही दयामाया न दाखवता मारहाण केली.

यादरम्यान, सिंह यांच्यासोबत राहत असलेल्या काही नातेवाईकांनी त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. काही लोकांनी सिंह यांना वाचवण्यापेक्षा या मारहाणीचा व्हिडीओ काढणे पसंत केले. हल्लेखोरांनी सिंह यांच्या कारवरदेखील काठ्या मारून तिचे नुकसान केले. त्यानंतर जेव्हा मेघ सिंह गंभीररीत्या जखमी झाले, तेव्हा हल्लेखोर त्यांच्या कारमध्ये बसून फरार झाले. त्यानंतर कुटुंबीय मेघ सिंह यांना तत्काळ बीकानेरच्या पीबीएम रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्यामध्ये मेघ सिंह यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली. त्यांच्या पायांमध्ये १० फ्रॅक्चर झाले. हा हल्ला कुणी केला आणि का केला, याची माहिती मिळू शकलेली नाही. या संदर्भात गुरुवारी रात्रीपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. मात्र पोलिसांनी कुठल्यातरी जुन्या वादातून ही मारहाणीची घटना घडली असावी, असे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसCrime Newsगुन्हेगारी