शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 23:47 IST

महिलांना दरमहा ३०००, शेतकऱ्यांना दरमहा ४०००... वाचा कुणाला काय-काय?

Jammu Kashmir Election, Congress Manifesto: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने या जाहीरनाम्याला 'अब बदलेगा हालात' असे नाव दिले आहे. काँग्रेस नेते पवन खेडा आणि तारिक हमीद कारा यांनी जाहीरनाम्याचे वाचन करताना सांगितले की, गेल्या १० वर्षांपासून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की काश्मिरी जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. पण आता सर्व समस्या संपण्याची वेळ आली आहे. आमच्याकडे टीम आहेत. आम्ही त्यांच्यामार्फत इनपूट गोळा केले आहेत आणि आम्ही त्यालाच लोकांचा जाहीरनामा म्हणतो.

पवन खेडा पुढे म्हणाले की, लोकांना त्यांच्या व्यथा मांडायला कोणीच नाही. कारण इथे थेट दिल्लीची सत्ता आहे. काश्मीर हे स्वप्नांचे कब्रस्तान बनले आहे. जाहीरनाम्याबाबत बोलताना ते म्हणाले की, हा दस्तऐवज केवळ आश्वासनांचा ढीग नाही, तर आम्ही अधिकारांवरही भर देऊन बोलतो. कारण संपूर्ण राज्यघटना अधिकार आणि कर्तव्यांवर आधारित आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना पक्षाने रोजगार, महिला आणि प्रशासनाबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्यात.

महिलांसाठी घोषणा

पक्षाने जाहीरनाम्यात महिलांसाठी अनेक आश्वासने दिली आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा ३,००० रुपये दिले जातील. 'सखी शक्ती' अंतर्गत प्रत्येक महिलेला बचत गटाकडून ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल. यासोबतच सर्व पोलीस ठाण्यात महिला पोलीस सेल स्थापन करण्यात येतील.

रोजगारासंदर्भात घोषणा

रोजगाराबाबत, काँग्रेस सरकार तरुणांना एका वर्षासाठी दरमहा ३,५०० रुपयांपर्यंतचा बेरोजगारी भत्ता देईल, असे आश्वासन पक्षाने दिले आहे. याशिवाय अनेक विभागांमध्ये रिक्त असलेली १ लाख सरकारी पदे भरली जातील. रिक्त सरकारी जागा भरण्यासाठी आम्ही ३० दिवसांच्या आत जॉब कॅलेंडर देखील जारी केले जाणार आहे.

शेतकऱ्यांना दरमहा ४ हजार रुपये मिळणार

शेतकऱ्यांबाबत घोषणा करताना काँग्रेसने म्हटले की, सरकार आल्यास भूमिहीन शेतकरी किंवा भाड्याच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसेल. सरकार त्यांना चार हजार रुपयांची मदत करणार आहे. शेती करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांसाठी सरकार ९९ वर्षांच्या लीजची व्यवस्था करेल. तर सफरचंद पिकासाठी किमान ७२ रुपये प्रतिकिलो दर निश्चित केला जाईल. याशिवाय, नैसर्गिक आपत्तींविरूद्ध सर्व पिकांसाठी १०० % पीक विमा देखील दिला जाईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक 2024