शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सचिन पायलट यांच्याबाबत काँग्रेस मोठा निर्णय घेणार, राजस्थानमधील सरकार वाचवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 12:33 IST

सचिन पायलट हे काँग्रेसचा हात सोडून समर्थक आमदारांसह भाजपामध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे.

ठळक मुद्दे सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहेअशोक गहलोत सरकारला १०९ आमदारांचा पाठिंबा

जयपूर/ नवी दिल्ली - राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे. सचिन पायलट हे काँग्रेसचा हात सोडून समर्थक आमदारांसह भाजपामध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. दरम्यान, सचिन पायलट यांची मनधरणी करण्याऐवजी काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. तसेच काही वेळाने होणाऱ्या बैठकीसाठी आमदारांना व्हिप बजावण्यात आला आहे.

 जर काँग्रेसचा कुणीही आमदार या बैठकीला अनुपस्थित राहिला तर त्याचे सदस्यत्व रद्द होईल, असे बैठकीसाठी जारी करण्यात आलेल्या व्हिपमध्ये पक्षाने म्हटले आहे. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस अविनाश पांडे यांनी सांगितले की, ‘१०९ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे पोहोचले आहे. हे आमदारा सोमवारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहतील. तसेच जे सदस्य या बैठकीला येणार नाहीत. त्यांचे सदस्यत्व रद्द होईल.’ 

तर रणदीप सुरजेवाला याबाबत म्हणाले की,’ आम्ही कुठल्याही व्यक्तीची गोष्ट करत नाही आहोत. तसेच या बैठकीला कुणी अनुपस्थित राहील, असे वाटत नाही,’ अविनाश पांडे आणि सचिन पायलट यांनी कुणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख सचिन पायलट यांच्या दिशेने होता हे स्पष्ट झाले आहे.

 यापूर्वी जयपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी रात्री उशिरा पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये अविनाश पांडे, रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अविनाश पांडे म्हणाले की, कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार आम्ही जयपूरमध्ये आलो आहोत. १०९ आमदारांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिली आहे. तसेच अन्य काही आमदारसुद्धा आमच्या संपर्कात आहेत. सकाळी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक आहे. त्या बैठकीसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. जो या बैठकीस अनुपस्थितीत राहील, त्याच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच व्हीपचे उल्लंघन केल्यास त्या सदस्याचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात येईल.

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थानPoliticsराजकारणSachin Pilotसचिन पायलट