शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

काँग्रेसमध्ये राहुलपर्व, पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, मोदी व भाजपावर कडाडून हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 5:58 AM

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सरकार व भाजपावर कडाडून हल्ला चढवला. मुख्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सरकार व भाजपावर कडाडून हल्ला चढवला. मुख्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले. या समारंभाला सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे सर्व राज्यांमधील महत्त्वाचे सारे नेते व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती.राहुल गांधी यांनी या वेळी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात तरुणांना द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. भाजपावर हल्ला करताना ते म्हणाले, काँग्रेसने देशाला २१व्या शतकात नेले; मात्र, आमचे पंतप्रधान आम्हाला मध्ययुगाकडे नेत आहेत. देशात दडपशाही, मारहाण केली जाते. लोकांना मारून टाकले जात आहे. कोणी काय खायचे, कोणी काय परिधान करायचे, हेही सत्ताधारी ठरवत आहेत.हा हिंसाचार लज्जास्पद आहे, अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा जगात मलिन होत आहे. या सरकारने देशाचे जे नुकसान केले आहे त्याची भरपाई करणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.राहुल गांधी यांनीपदभार स्वीकारलाराहुल गांधी यांनी वयाच्या ४७व्या वर्षी १३२ वर्षे जुन्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा पक्षाच्या निवडणूक प्राधिकरणाने त्यांना ते निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले. या वेळी त्यांची बहीण प्रियंका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते.मान्यवरांकडून शुभेच्छाकाँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलराहुल गांधी यांना द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन, अभिनेते कमल हासन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या. केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, या मोठ्या जबाबदारीसाठी व आपल्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा.१९७१च्या युद्धातीलशहिदांना आदरांजलीकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विजय दिवसाच्या निमित्ताने १९७१च्या युद्धातील भारतीय शहिदांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी ट्विट केले की, १९७१च्या युद्धातील शहिदांच्या साहस आणि बलिदानाला सलाम. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले त्या शूरवीरांची आठवण करू या. या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला होता. या युद्धानंतर बांगलादेशाची स्थापना झाली होती.ते संपवण्याची भाषा करतात,आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो!भाजपाचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले, गत काही वर्षांत काँग्रेसला कमजोर करण्यासाठी हल्ले केले जात आहेत. ते आम्हाला पराभूत करू शकतात. मात्र, आमचा आवाज दाबू शकत नाहीत. ते जेवढा द्वेष, राग दाखवतील तेवढेच आम्ही मजबूत होऊ. भाजपा स्वत:साठी लढत आहे; तर, काँग्रेस देशातील प्रत्येक बहीण-भावासाठी लढत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी