राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 06:43 IST2025-05-24T06:42:31+5:302025-05-24T06:43:54+5:30
याआधी राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीबाबत प्रश्न विचारले होते.

राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत व पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास कोणी सांगितले? पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा निषेध करण्यास एकही देश पुढे का आला नाही? भारताचे नाव प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानसोबत का जोडण्यात येत आहे? असे तीन सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना शुक्रवारी केले.
याआधी गुरुवारी राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीबाबत प्रश्न विचारले होते.