शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

"जवान नाही, शेतकरीही नाही, मोदी सरकारसाठी 3-4 उद्योजक मित्रच देव", राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 14:52 IST

Congress Rahul Gandhi Slams Modi Government : राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला असून टीकास्त्र सोडलं आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, भारत-चीन तणाव, शेतकरी आंदोलन यासह विविध मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर  (Modi Government) जोरदार हल्लाबोल करत आहे. यानंतर आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला असून टीकास्त्र सोडलं आहे. "जवान नाही, शेतकरीही नाही, मोदी सरकारसाठी 3-4 उद्योजक मित्रच देव आहेत" असं म्हणत राहुल यांनी जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी व जवानांच्या हिताचा नसून फक्त उद्योजकांच्या फायद्याचा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात. जवानही नाही, शेतकरीही नाही मोदी सरकारसाठी तीन-चार उद्योजक मित्रच देव आहेत" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आपल्या एका ट्विटमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. राहुल यांनी बुधवारी (3 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. जगभरातील काही हुकुमशहांची नावं त्यांनी ट्विटद्वारे जाहीर केली आहेत. तसेच या सर्व हुकुमशहांची नावं ‘M’ या अद्याक्षरानेच का सुरू होतात असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे होता. मात्र त्यांच्या या ट्विटला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. थेट पूर्वजांच्या नावांची आठवण करून देत भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसही राहुल यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेत नाही म्हणत टीका केली आहे. 

"'M' पासून मोतीलाल नेहरू यांचंही नाव येतं हे राहुल गांधी विसरले वाटतं", भाजपाने लगावला सणसणीत टोला

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राहुल गांधींना उत्तर दिलं आहे "राहुल गांधी यांच्या वक्तव्याला काँग्रेसही गंभीरतेने घेत नाही. जर एमपासून सुरू केलं तर मोतीलाल नेहरू यांचंही नाव येतं. त्यामुळे त्यांनी जरा बघून टिप्पणी करायला हवी" असं म्हणत तोमर यांनी राहुल गांधींना सणसणीत टोला लगावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "Marcos (मार्कोस), Mussolini (मुसोलिनी), Milošević (मिलोसेविक), Mubarak (मुबारक), Mobutu (मोबुतू), Musharraf (मुशर्रफ), Micombero (मायकोंबेरो) या सर्व हुकुमशहांची नावं ‘M’ नेच का सुरू होतात?" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. 

"राहुल गांधींची देश तोडण्याची भाषा, पोलिसांप्रती सहानुभूतीचा एक शब्दही नाही"

प्रजासत्ताक दिनप्रसंगी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हे पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलौईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात जखमी झाले. याच दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी देश तोडण्याची भाषा करत आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसेचं रुप आल्यानंतर अनेक पोलीस, मीडिया प्रतिनिधी जखमी झाले. मात्र त्यांच्याप्रती राहुल गांधींनी एकही सहानुभूतीचा शब्द वापरला नाही असं म्हटलं आहे. "26 जानेवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात 300 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहेत. याशिवाय काही पत्रकारही जखमी झाले आहेत. अनेक महिला पोलिसांवर हल्ला झाला. मीडिया प्रतिनिधींवर हल्ला झाला. त्यांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याप्रती राहुल गांधी यांच्या तोंडातून एकही संवेदशील शब्द निघाला नाही" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाFarmerशेतकरीbudget 2021बजेट 2021