Rahul Gandhi : "एका देशात दोन नवे देश तयार करताहेत, भाजपाला खरा हिंदुस्थान दाखवू"; राहुल गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 06:15 PM2022-02-03T18:15:53+5:302022-02-03T18:28:32+5:30

Congress Rahul Gandhi And BJP : राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Congress Rahul Gandhi big attack on bjp says two new countries being created with in country | Rahul Gandhi : "एका देशात दोन नवे देश तयार करताहेत, भाजपाला खरा हिंदुस्थान दाखवू"; राहुल गांधींचं टीकास्त्र

Rahul Gandhi : "एका देशात दोन नवे देश तयार करताहेत, भाजपाला खरा हिंदुस्थान दाखवू"; राहुल गांधींचं टीकास्त्र

Next

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा भाजपा (BJP) आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपाला खरा हिंदुस्थान दाखवू" असं म्हणत निशाणा साधला आहे. रायपूरमध्ये राहुल गांधी यांनी "धोका कोणत्या गोष्टीचा आहे? सर्वात पहिला भयंकर धोका म्हणजे भाजपा आज एक देश दोन देशांमध्ये विभागत आहे. दोन नवे देश बनवले जात आहेत. एक देश निवडक करोडपतींचा. त्या देशात विमाने, अद्ययावत तंत्रज्ञान, स्टॉक मार्केटचा पैसा आहे. त्या देशात जेवढी देशाची संपत्ती तुम्हाला हवी, तुम्ही घेऊ शकता. दुसरा देश आपल्या प्रिय देशवासीयांचा, कोट्यवधींचा देश" असं म्हटलं आहे. 

"70 वर्षांत काय झालं? असा प्रश्न तुम्ही उपस्थित करता, तेव्हा तुम्ही काँग्रेसचा नाही तर हा देश घडवणाऱ्या गरीबांचा, शेतकऱ्यांचा, त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करता" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी यावेळी भाजपा भारतात दोन देश करू पाहात आहे, या आपल्या विधानाचा देखील पुनरुच्चार केला. "एक श्रीमंत देश शे-पाचशे लोकांचा आणि दुसरा देश भारतातल्या कोट्यवधी नागरिकांचा. त्यांना वाटतं दोन देश बनवल्यामुळे गरीबांचा देश शांत बसून राहील. गरिबांमध्ये शक्ती नाही. भारतातला गरीब घाबरतो. पण हिंदुस्थानमधला गरीब घाबरत नाही" असं देखील ऱाहुल यांनी म्हटलं आहे. 

"जर या देशाला कुणी इथपर्यंत पोहोचवलंय, देशात प्रगती झाली आहे, तर ती कुठल्या पक्षामुळे झालेली नाही. ती भारतातल्या गरीबांनी घडवून आणली आहे. जेव्हा तुम्ही म्हणता 70 वर्षांत काय झालं? तेव्हा हे काँग्रेस पक्षाचा अपमान करत नाहीत, ते देशातल्या गरीबांचा, शेतकऱ्यांचा, त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करत आहेत" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. "छत्तीसगडमध्ये मोठं पाऊल उचललं जात आहे. छत्तीसगडमध्ये आम्ही शेतकऱ्यांना 2500 रुपये देऊ असे आश्वासन दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलं" असंही राहुल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: Congress Rahul Gandhi big attack on bjp says two new countries being created with in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.