Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 15:56 IST2025-11-02T15:55:09+5:302025-11-02T15:56:09+5:30
Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतः तलावात उडी मारली आणि स्थानिक मच्छिमारांसोबत पारंपारिक मासेमारी प्रक्रियेत भाग घेतला.

Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय पक्ष प्रचारात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शनिवारी बेगुसरायमध्ये एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतः तलावात उडी मारली आणि स्थानिक मच्छिमारांसोबत पारंपारिक मासेमारी प्रक्रियेत भाग घेतला.
राहुल गांधींच्या या कृतीने उपस्थित गावकऱ्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली, त्यांना फार आनंद झाला. लोकांनी राहुल गांधींना तलावात उडी मारताना, जाळं टाकताना आणि मासे पकडताना पाहिलं. या दृश्याने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच तलावात तयारी सुरू होती. राहुल गांधी आल्यावर गावकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने त्यांचं स्वागत केलं. कोणताही संकोच न करता त्यांनी तलावात उडी मारली आणि मच्छिमारांसोबत जाळं टाकलं. तलावाजवळ उपस्थित असलेले लोक म्हणाले, "आम्ही यापूर्वी कधीही असं दृश्य पाहिलं नव्हतं. आमच्या परंपरांना स्वीकारत एक प्रमुख नेता अशा प्रकारे आमच्यात आला आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे."
#WATCH | Bihar: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi jumped into a pond and participated in a traditional process of catching fish in Begusarai.
— ANI (@ANI) November 2, 2025
VIP chief and Mahagathbandhan's Deputy CM face, Mukesh Sahani, Congress leader Kanhaiya Kumar, and others also present. pic.twitter.com/yNPcx2C3bn
राहुल गांधींसोबत यावेळी व्हीआयपी प्रमुख मुकेश सहनी आणि काँग्रेस नेते कन्हैया कुमार देखील उपस्थित होते. तिन्ही नेते एकत्र तलावात उतरले, गावकऱ्यांशी संवाद साधला आणि स्थानिक जेवणाचा आस्वाद घेतला. सहनी म्हणाले, "हा केवळ एक उपक्रम नाही तर बिहारच्या मातीशी जोडलं जाण्याचा संदेश आहे."
राहुल गांधी तलावात उतरल्याच्या व्हिडीओला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी व्हिडीओ शेअर करत त्यांना "खरा लोकनेता" असं म्हटलं आहे. काँग्रेस नेते म्हणतात, "राहुल गांधी केवळ भाषणांद्वारेच नव्हे तर ग्राऊंड लेव्हलवर येऊन जनतेशी जोडले जात आहेत." राजकीय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, राहुल गांधींचा दौरा बिहार निवडणुकीच्या संदर्भात एक महत्त्वाचा प्रतीकात्मक मेसेज देत आहे.