शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

CoronaVirus Live Updates : "लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान सुद्धा गायब"; राहुल गांधींचा मोदींना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 12:52 IST

Congress Rahul Gandhi Slams Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाची देशातील स्थिती, लसीकरण, औषधं असा विविध मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,37,03,665 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,62,727 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,120 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,58,317 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाची देशातील स्थिती, लसीकरण, औषधं असा विविध मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. 

राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी कोरोनावरील लसींचा तुटवडा आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. "लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब" असल्याचं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब आहेत. उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. याआधी देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात असल्याचं म्हणत मोदींना सल्ला दिला आहे. तसेच सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती देखील राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली आहे. कोरोना व्हायरसच्या सर्व स्वरुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे केला आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तराच्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे असा गंभीर आरोपही राहुल यांनी आपल्या पत्रातून केला आहे. अशावेळी गेल्या वर्षीसारखं गरिबांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागू नये यासाठी तातडीने आर्थिक मदत पोहचवण्यात यावी असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

"देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात"; राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, दिले 'हे' सल्ले

"सध्याची परिस्थिती पाहता डबल म्यूटेंट आणि ट्रिपल म्यूटेंट पाहायला मिळत आहे, याची मला भीती वाटते. या व्हायरचं अनियंत्रितरित्या प्रसार होणं हे फक्त देशासाठीच नाही तर जगासाठी अतिशय घातक ठरू शकतं" असं म्हटलं आहे. तसेच हा व्हायरस आणि त्याच्या विविध प्रकारांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास व्हायला हवा. सर्व जनतेला त्वरीत लसीकरण सहभागी करून घ्यायला हवं. पारदर्शक होत उर्वरित जगाला आपल्या निष्कर्षांबद्दल माहिती दिली जावी' असा सल्ला राहुल गांधींनी दिला आहे. केंद्र सरकारकडे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी किंवा लसीकरण मोहीम राबवण्यासाठी कोणतीही स्पष्ट रणनीती नसल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. 

"…हा गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय; लोकांचे जीव वाचवण्याकडे लक्ष द्या, नव्या घरासाठी आंधळा अहंकार नको"

"सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे" असं म्हणत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. "सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांचा जीव वाचवण्याकडे लक्ष द्या, नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांनी याआधीही मोदी सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी 10 डिसेंबरला या नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले होते. या प्रोजेक्ट अंतर्गत पुढील वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत ज्या इमारतींचे काम पूर्ण होणार आहे, त्यात पंतप्रधान निवासस्थानाचाही (Prime Minister's residence) समावेश आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारत