"देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात"; राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, दिले 'हे' सल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 03:17 PM2021-05-07T15:17:01+5:302021-05-07T15:26:29+5:30

Congress Rahul Gandhi Letter To PM Narendra Modi On Covid Issue : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे.

Congress rahul gandhi letter to pm narendra modi on covid issue | "देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात"; राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, दिले 'हे' सल्ले

"देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात"; राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, दिले 'हे' सल्ले

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,14,91,598 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,14,188 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर  3,915 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,34,083 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात असल्याचं म्हणत मोदींना सल्ला दिला आहे. तसेच सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती देखील राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली आहे. 

कोरोना व्हायरसच्या सर्व स्वरुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे केला आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तराच्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे असा गंभीर आरोपही राहुल यांनी आपल्या पत्रातून केला आहे. अशावेळी गेल्या वर्षीसारखं गरिबांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागू नये यासाठी तातडीने आर्थिक मदत पोहचवण्यात यावी असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधी यांनी पत्रामध्ये "पुन्हा एकदा तुम्हाला पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर आली आहे कारण आपला देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात सापडला आहे. अशा प्रकारच्या अनपेक्षित संकटात भारतीय जनतेलाच आपलं सर्वात जास्त प्राधान्य असायला हवं. देशातील जनतेला या त्रासातून वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याची मी तुम्हाला विनंती करत आहे" असं म्हटलं आहे. तसेच "जगातील प्रत्येक सहा लोकांमध्ये एक व्यक्ती भारतीय आहे. आकार, भारतातील अनुवांशिक विविधता आणि गुंतागुंतीमुळे भारतात व्हायरसला आपलं स्वरूप बदलण्यासाठी आणि अधिक धोकादायक होण्यासाठी अनुकूल वातावरण मिळत आहे."

"सध्याची परिस्थिती पाहता डबल म्यूटेंट आणि ट्रिपल म्यूटेंट पाहायला मिळत आहे, याची मला भीती वाटते. या व्हायरचं अनियंत्रितरित्या प्रसार होणं हे फक्त देशासाठीच नाही तर जगासाठी अतिशय घातक ठरू शकतं" असं म्हटलं आहे. तसेच हा व्हायरस आणि त्याच्या विविध प्रकारांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास व्हायला हवा. सर्व जनतेला त्वरीत लसीकरण सहभागी करून घ्यायला हवं. पारदर्शक होत उर्वरित जगाला आपल्या निष्कर्षांबद्दल माहिती दिली जावी' असा सल्ला राहुल गांधींनी दिला आहे. केंद्र सरकारकडे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी किंवा लसीकरण मोहीम राबवण्यासाठी कोणतीही स्पष्ट रणनीती नसल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. 

"…हा गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय; लोकांचे जीव वाचवण्याकडे लक्ष द्या, नव्या घरासाठी आंधळा अहंकार नको"

"महामारीवर विजय मिळवण्याची घोषणा केंद्र सरकारकडून केली जात होती तेव्हा व्हायरसचा आणखी वेगाने प्रसार होत होता" असंही राहुल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  "सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे" असं म्हणत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांचा जीव वाचवण्याकडे लक्ष द्या, नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी याआधीही मोदी सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी 10 डिसेंबरला या नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले होते. या प्रोजेक्ट अंतर्गत पुढील वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत ज्या इमारतींचे काम पूर्ण होणार आहे, त्यात पंतप्रधान निवासस्थानाचाही (Prime Minister's residence) समावेश आहे. 

Web Title: Congress rahul gandhi letter to pm narendra modi on covid issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.