शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा राजकारणात केव्हा उतरणार? स्वतः त्यांनीच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 16:52 IST

जयपूर येथे येण्यासंदर्भात विचारले असता, आपण येथे दर्शणासाठी आलो होतो, यावेळी आपण सर्वांसाठीच आशिर्वाद मागितले, असे त्यांनी सांगितले. याच बरोबर त्यांनी सक्रिय राजकारणात येण्यासंदर्भातही भाष्य केले. (Priyanka Gandhi husband Robert Vadra)

ठळक मुद्देगांधी कुटुंबाचे जावई आणि व्यापारी रॉबर्ट वाड्रा शुक्रवारी जयपूर येथे आले होते. त्यांनी मोती डूंगरी मंदिरात गणपतीचे दर्शण घेतले.त्यांनी सक्रिय राजकारणात येण्यासंदर्भातही भाष्य केले.

जयपूर - गांधी कुटुंबाचे जावई आणि व्यापारी रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) शुक्रवारी जयपूर (Jaipur) येथे आले होते. यावेळी त्यांनी मोती डूंगरी मंदिरात गणपतीचे दर्शण घेतले. जयपूर येथे येण्यासंदर्भात विचारले असता, आपण येथे दर्शणासाठी आलो होतो, यावेळी आपण सर्वांसाठीच आशिर्वाद मागितले, असे त्यांनी सांगितले. याच बरोबर त्यांनी सक्रिय राजकारणात येण्यासंदर्भातही भाष्य केले. कोरोनादरम्यान ते पहिल्यांदाच जयपुरात आले होते. (Congress Priyanka Gandhi husband Robert Vadra said about entry in politics)

दिल्लीतील एकाच शाळेत शिकत होते रॉबर्ट वाड्रा अन् प्रियंका गांधी; जाणून घ्या इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी

जेव्हा राजकीय लढाई आवश्यक वाटेल तेव्हा राजकारणात येईन - सक्रिय राजकारणात येण्यासंदर्भात विराचले असता, रॉबर्ट वाड्रा म्हणाले, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. योग्य वेळ असायला हवी. मी राजकारणापासून दूर असूनही काम करत आहे. एखादी लढाई राजकीय दृष्या आवश्यक आहे, असे जेव्हा वाटले, तेव्हा ती लढाई लढण्यासीठी मी नक्कीच राजकारणात येईन. 

...तर शेतकरी आंदोलन संपेल -शेतकरी आंदोलन आणि महागाईच्या मुद्द्यावर बोलताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले, शेतकऱ्यांशी चर्चा व्हायला हवी, त्यांच्याशी चर्चा झाली तर शेतकरी आंदोलन संपेल. सरकारने एखादी योजना तयार केली तर त्या योजनेशी लोकांना जोडावे लागेल. केंद्र सरकारने लोकांवर दबाव टाकू नये. महागाईवर बोलताना वाड्रा म्हणाले, यामुळे लोकांचा त्रास वाढत आहे. एवढेच नाही, तर माझ्या जवळपासचे लोक म्हणतात, की आपण आमचा आवाज उचलावा.

“...आता मला संसदेत गेलंच पाहिजे”; रॉबर्ट वाड्रांच्या राजकीय एन्ट्रीला कोण लावतंय ब्रेक? जाणून घ्या

मी राजकीय गोष्टीत पडत नाही -देशभरात काँग्रेस कमकुवत होत असल्यासंदर्भात आणि कठोर निर्णय घेण्यासंदर्भात विचारले असता, मी राजकीय विषयात पडू इच्छित नाही, असे वाड्रा म्हणाले. मी केवळ लोकांना होत असलेला त्रास प्रकाशात आणतो. सायकलवरून ऑफिसात जाणेही, याच प्रकारचे एक प्रतिकात्मक पाऊल होते. आम्ही काम करत राहू. लोक समजतील आणि आम्ही त्याचा आवाज उचलत राहू, असे वाड्रा म्हणाले.

सरकार सुरुवातीपासूनच निशाणा करत आहे -गांधी आणि वाड्रा कुटुंबाला सरकार निशाणा बनवत आहे, असे विचारले असता, ते म्हणाले, हे सुरुवातीपासूनच सुरू आहे, सर्व गोष्टी स्पष्ट आहेत. तपास संस्था जेजे मागत आहेत, ते मी सर्व प्रकारे स्पष्ट करत आहे. आम्ही लोकांसाठी काम करतो. यामुळेच आम्हाला निशाणा केले जात आहे. 

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान