शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यात पाईप टाकून भजी तळा; मोदींच्या 'त्या' विधानावर राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 16:28 IST

मोदींच्या रोजगार निर्मितीच्या धोरणांवर राहुल गांधींची सडकून टीका

बंगळुरू: नाल्यातून निघणाऱ्या गॅसचा इंधन म्हणून वापर करत चहा तयार करणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचीकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी खिल्ली उडवली आहे. नाल्यात पाईप टाकून गॅस काढा आणि भज्या तळा, हीच पंतप्रधान मोदींची रोजगार निर्मितीची योजना असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. कर्नाटकमधील बिदर येथे एका रॅलीला संबोधित करताना राहुल यांनी मोदींवर तुफान शाब्दिक हल्ला चढवला. एका चहावाल्याचं उदाहरण देणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील मोदींच्या विधानांचा राहुल गांधींनी समाचार घेतला. 'नाल्यातून निघणाऱ्या गॅसच्या मदतीनं रोजगार देण्याची योजना मोदी तयार करत आहेत. आधी मोदींनी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता मोदी तरुणांना भज्या तळण्याचा सल्ला देत आहेत,' अशी टीका राहुल गांधींनी केली. पंतप्रधान मोदींनी 10 ऑगस्टला जागतिक जैव इंधन दिवसाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात चहावाल्याचा किस्सा सांगितला होता. 'एका शहरात एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला चहा तयार करायचा. त्याच्या बाजूनं एक नाला वाहायचा. त्यानं एक छोटंसं भांडं पालथं घालून नाल्यावर ठेवलं. नाल्यातून निघणारा गॅस त्यानं आपल्या टपरीकडे वळवला आणि त्याच गॅसच्या मदतीनं तो चहा तयार करु लागला,' असा किस्सा मोदींनी सांगितला होता. मोदींच्या याच विधानावर राहुल गांधींनी सडकून टीका केली. नाल्यात पाईप टाकून गॅस जमा करा आणि भज्या तळा, हीच मोदींची रोजगार निर्मितीची योजना असल्याचं राहुल गांधी म्हणाले. मोदींच्या धोरणांचा फायदा फक्त 15-20 लोकांना झाला आहे आणि मोदी देशातील तरुणांना भज्या तळायला सांगत आहेत, असं राहुल यांनी म्हटलं. मोदी देशाचे पंतप्रधान नसून केवळ 15-20 लोकांचे पंतप्रधान असल्याचं राहुल गांधी म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस