शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी डरपोक; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 16:22 IST

पंतप्रधान मोदींसह भाजपा, संघावर राहुल गांधींची घणाघाती टीका

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्याही मंचावर माझ्यासोबत 10 मिनिटं चर्चा करावी. पण ते घाबरतात. त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट जाणवू लागली आहे. ते अतिशय भित्रे आहेत, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. दिल्लीत पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीला राहुल यांनी संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. जाती-धर्मांमध्ये देशाचे तुकडे केल्यानं, द्वेष पसरवल्यानं भारतावर राज्य करता येत नाही, हे आता मोदींच्या लक्षात आलं आहे. देशाच्या पंतप्रधानांनी जोडण्याची भाषा करायला हवी. जो देशाला तोडण्याची भाषा करेल, त्याला पंतप्रधान पदावरुन हटवण्यात येईल, अशी टीका राहुल यांनी केली. मोदींची छाती 56 इंचांची आहे, असं आधी म्हटलं जायचं. त्यांची सत्ता 15 वर्षे कायम राहणार असल्याचंही बोललं जात होतं. मात्र आज मोदींची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे, असं म्हणत राहुल यांनी हल्लाबोल केला. मोदींचा खरा चेहरा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशासमोर आणला आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेस नरेंद्र मोदी, भाजपा आणि संघाचा पराभव करेल, असं राहुल म्हणाले. यावेळी राहुल यांनी चौकीदार चोर है अशा घोषणादेखील दिल्या. देशातील चौकीदार आज माझ्यावर रागावतात. तुम्ही आमची बदनामी करता, अशी त्यांची तक्रार असते. मात्र मला देशातील चौकीदारांचा अपमान करायचा नाही. मी फक्त एकाच चौकीदाराबद्दल बोलतो, ज्यानं चोरी केली आहे, असा टोला राहुल यांनी लगावला. आगामी निवडणूक ही दोन विचारांमधील लढाई आहे. यातील एक विचारधारा हा देश सर्वांचा असल्याचं म्हणते. तर दुसरी विचारधारा हा देश केवळ एका समुदायाचा असल्याचा दावा करते. देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आजाद होते. देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचा पाया विक्रम साराभाईंनी रचला. देशाच्या आर्थिक प्रगतीचा विचार केल्यास मनमोहन सिंग यांच्या नावाचा आदरानं उल्लेख करावा लागेल, असं राहुल म्हणाले. भाजपा अध्यक्ष अमित शहांना हा देश म्हणजे एक उत्पादन वाटतो. ते या देशाला सोने की चिडिया समजतात. त्या सोन्याचा फायदा देशातल्या मोजक्या लोकांना व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे, अशा शब्दांमध्ये राहुल भाजपावर तुटून पडले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शहाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ